Mumbai BMC Election Results 2026 Live : वॉर्ड क्रमांक ५४मध्ये आमदार सुनील प्रभूंचे पुत्र अंकित प्रभू विजयी!

16 Jan 2026 14:15:34

bmc

मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026)
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गोरेगाव पूर्वमधील वॉर्ड क्रमांक ५४ मध्ये उबाठा आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू हे विजयी झाले आहे. युवा उमेदवार असलेल्या अंकित प्रभू (Ankit Prabhu) यांनी भाजप उमेदवार विप्लव अवसरे यांचा पराभव करुन त्यांनी विजय मिळवला आहे. (Mumbai BMC Election Results 2026)

या वॉर्डकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात होते. भाजपने येथे अनुभवी उमेदवार मैदानात उतरवला असताना, उबाठा गटाकडून युवा चेहरा देण्यात आला होता. प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरिक सुविधा, पायाभूत सोयी आणि युवकांचे प्रश्न हे मुद्दे केंद्रस्थानी होते. अखेर मतदारांनी युवा नेतृत्वाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. (Mumbai BMC Election Results 2026)


Powered By Sangraha 9.0