मुंबईत महायुतीच्या उमेदवाराचा पहिला विजय! शिवसेनेच्या रेखा राम यादव विजयी
16 Jan 2026 11:11:02
मुंबई :( Mumbai BMC 2026 ) मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून मुंबईत महायुतीच्या उमेदवाराचा पहिला विजय नोंदवला गेला आहे.
मुंबईत महायुतीकडून शिवसेनेच्या उमेदवार रेखा राम यादव यांनी विजय मिळवला आहे. त्या मुंबईतील प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढवत होत्या. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीतच रेखा राम यादव यांनी आघाडी घेत विजय निश्चित केला आहे.