Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; पहिल्याच कलात बहुमताचा टप्पा पार

16 Jan 2026 15:37:26
Ichalkaranji Municipal Corporation 
 
इचलकरंजी : (Ichalkaranji Municipal Corporation) इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत यश मिळवत शहरावर आपला झेंडा फडकावला आहे. पहिल्याच कलात भाजपच्या चार उमेदवारांनी विजय मिळवत गुलाल उधळला, तर एकूण ६५ जागांपैकी तब्बल ४० जागांवर आघाडी घेत भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला. यामुळे इचलकरंजी महापालिकेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. (Ichalkaranji Municipal Corporation)
 
हेही वाचा :  KDMC Eletion Result कल्याण डोंबिवलीत मनसेचा पहिला विजय! : प्रल्हाद म्हात्रे विजयी
 
पहिल्या फेरीत भाजपचे रणजित भीमराव अनुसे, सतीश वसंतराव मुळीक, वैशाली सुनील पोवार आणि जुलेखा जहाँगीर पटेकरी यांनी विजय मिळवला. या निकालांनंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीत शिवशाहू आघाडी तसेच इतर स्थानिक आघाड्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. (Ichalkaranji Municipal Corporation)
 
 
Powered By Sangraha 9.0