Chandrashekhar Bawankule : विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हाच ब्रँड आहे - चंद्रशेखर बावनकुळे

16 Jan 2026 16:14:14
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) भाजपा महायुतीला राज्यात आणि मुंबई महापालिका निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशावर बोलताना बोलताना शुक्रवार दि.१६ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास आणि विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हाच ब्रँड आहे. यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ आहे.महाराष्ट्राचे पुढचे राजकारण विकासाला आहे. ज्याठिकाणी विरोधक हरतात तिथे इ वी एम मशीन खराब दिसते. जिथे ते जिंकले आहेत तिथे मशीन खराब आहे हे साध्य करावे."(Chandrashekhar Bawankule)
 
बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुढे म्हणाले की,"आम्ही पराभवातून शिकतो आणि जिंकतो पण विरोधक पराभवात मशीनला दोष देत बसतात.२०४७ नंतर बघू काँग्रेसचे काय होईल तोपर्यंत त्यांना काही संधी नाही आहे. विजयाचा उन्माद आम्ही करत नाही त्यामुळे जनतेला अपेक्षित असा विजयोत्सव आम्ही करत असतो."(Chandrashekhar Bawankule)
 
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : मनसेच्या इंजिनाला धडक! मुंबईत प्रभाग १०४ भाजपाचे प्रकाश गंगाधरेंचा विजय 
 
पुढे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की," डबल इंजिन सरकारला ग्रामीण भागात देखील मान्यता आहे. जेव्हा आरक्षण निघेल तेव्हा महापौर निवडणूक होईल. विरोधक भावनिक आव्हानावर तर आम्ही विकसित मुंबई आणि विकसित महाराष्ट्र या मुद्यांवर निवडणूक लढत होतो. कुणाच भविष्या मी सांगू शकत नाही पण जे चुकीच्या रस्त्यावर गेले त्यांचा निर्णय जनतेने केला आहे आम्ही योग्य रस्त्यावर होतो. संघटन आणि सरकार एकत्र चालली आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली."(Chandrashekhar Bawankule)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0