Mumbai BMC Election Results 2026 Live : प्रस्थापितांना दणका! प्रभाग क्रमांक ३८मध्ये सुरेखाताई परब यांचा विजय

16 Jan 2026 14:18:47
Mumbai BMC Election Results 2026 Live
 
मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मनसेचे विधानसभा अध्यक्ष भास्कर परब यांच्या ताई, सुरेखा परब यांचा प्रभाग क्रमांक ३८ मधून विजय झाला. (Mumbai BMC Election Results 2026 Live) प्रस्थापित शिवसेना नगरसेवक आत्माराम चाचे यांच्या गडाला सुरूंग लावण्यात मनसेला यश मिळाले आहे. नगरसेवक चाचे यांनी यावेळी त्यांच्या स्नुषा रिशिता चाचे यांना मैदानात उतरवले होते. शिवसेना विरुद्ध उबाठा या लढतीत यंदा मनसेच्या वाट्याला ही जागा आली होती. त्यामुळे मनसेच्या पाठिशी यंदा उबाठा समर्थकांनीही ताकद लावली होती.(Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : वॉर्ड क्रमांक ५४मध्ये आमदार सुनील प्रभूंचे पुत्र अंकित प्रभू विजयी!  
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भास्कर परब यांनी विधानसभा निवडणूक (Mumbai BMC Election Results 2026 Live) लढवली होती. त्यावेळी त्यांनी विद्यमान आमदार सुनील प्रभूंना टक्कर दिली होती. तेव्हाही मनसेच्या मतदारांची ताकद दिसल्याने यावेळी ही जागा भास्कर परब यांच्या प्रयत्नाने मनसेच्या वाट्याला आली. ठाकरेंच्या मतदारांच्या पाठिंब्याने पहिल्यांदाच या विभागात मनसेचा नगरसेवक निवडून (Mumbai BMC Election Results 2026 Live) आला. प्रस्थापित नगरसेवकांविरोधात असलेला रोष लक्षात घेता यंदा मतदारांनी नव्या उमेदवाराला संधी दिली आहे.(Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0