Mumbai BMC Election Results 2026 Live : मुंबई प्रभाग १९४ मधून सदा सरवणकरांचे पुत्र पराभूत

16 Jan 2026 14:17:01
Mumbai BMC Election
 
मुंबई : ( Mumbai BMC Election Results 2026 ) तब्बल नऊ वर्षांनंतर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. त्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
 
दक्षिण मध्य मुंबईतील प्रभाग क्रमांक १९४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. हा प्रभाग शिंदे गटाच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, येथून शिंदे गटाकडून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे.
 
 हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : वॉर्ड क्रमांक ५४मध्ये आमदार सुनील प्रभूंचे पुत्र अंकित प्रभू विजयी!
 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या या लढतीत निशिकांत शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवत प्रभाग १९४ मध्ये बाजी मारली आहे.

Powered By Sangraha 9.0