BMC Elections : राज्यभरातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; आज निकाल

15 Jan 2026 20:21:48
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक आरोप-प्रत्यारोप, बोटावरील शाई, दुबार मतदार, ईव्हीएम, वादविवाद, हाणामारी आणि गोंधळाने भरलेल्या महानगरपालिका निवडणूकांसाठी (BMC Elections) गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली आणि सांयकाळी ५.३० पर्यंत मतदान पार पडले.(BMC Elections)
 
लोकसभा आणि विधानसभेत असलेली महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यावेळी पाहायला मिळालेली नाही. या निवडणूकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या युत्या आघाड्या दिसल्या. अनेक ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते तर, बऱ्याच ठिकाणी एकमेकांचे विरोधक सोबत आले होते. विशेषत: मुंबईत भाजप-शिवसेना-रिपाइं ही महायुती आणि ठाकरे बंधूंसह शरद पवार गट या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.(BMC Elections)
 
दरम्यान, ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदारांनी १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले असून २९ महानगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार, याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत उभे होते.(BMC Elections)
 
हेही वाचा : I-PAC Raid Row : सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका! 'आयपॅक'प्रकरणी बजावली नोटीस
 
बोटावरची शाई निघाल्याने गदारोळ
 
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदानानंतर मतदारांच्या बोटावरची शाई निघून जात असल्याचा आरोप केला. अनेकांनी बोटावरची शाई निघतानाचे व्हिडीओही काढले. त्यानंतर यावरून बरेच राजकीय वाद-प्रतिवाद पाहायला मिळाले. तर, सोलापूरसह विविध भागांत ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला. धुळे येथे भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप करत उमेदवार आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. शिवाय मतदान केंद्र बदलल्यानेही अनेक मतदारांचा गोंधळ उडाला.(BMC Elections)
 
मतदानाची टक्केवारी (दुपारी ३.३० पर्यंत)
 
बृहन्मुंबई - ४१.०८
ठाणे - ४३.९६
कल्याण-डोंबिवली - ३८.६९
नवी मुंबई - ४५.५१
उल्हासनगर - ३४.८८
भिवंडी - ३८.२१
मिरा-भाईंदर - ३८.३४
वसई-विरार - ४६.००
पनवेल - ४४.०४
पुणे - ३९.००
पिंपरी-चिंचवड - ४०.५०
नाशिक - ३९.६४
मालेगाव - ४६.१८
धुळे - ३६.४९
जळगाव - ३४.२७
अहिल्यानगर - ४८.४९
सांगली-मिरज-कुपवाड - ४१.७९
छ. संभाजीनगर - ४३.६७
नांदेड - ४२.४७
लातूर - ४३.५८
सोलापूर - ४०.३९
कोल्हापूर - ५०.८५
परभणी - ४९.१६
जालना - ४५.९४
नागपूर - ४१.२३
अमरावती - ४०.६२
अकोला - ४३.३५
चंद्रपूर - ३८.१२
इचलकरंजी - ४६.२३
Powered By Sangraha 9.0