सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावांपासून मुलांना वाचवण्यासाठी भारतीय संस्कृतीशी जोडणे आवश्यक

15 Jan 2026 17:14:15
RSS Leader Dattatreya Hosabale
 
मुंबई : ( RSS Leader Dattatreya Hosabale ) आज सोशल मीडिया सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या सामग्रीने भरलेला आहे. मुलांना त्याच्या नकारात्मक परिणामांपासून वाचवण्यासाठी, त्यांना भारतीय संस्कृतीशी जोडणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी मुलांशी संवाद साधण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले. ते संघ शताब्दी निमित्त रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक सद्भाव बैठकीत बोलत होते.
 
या कार्यक्रमात विविध संघटना, जाती, समुदाय आणि समुदायातील ६०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सरकार्यवाह म्हणाले की, आपण कोणत्या कुटुंबात किंवा जातीत जन्माला यावे ते आपल्या हाती नसते. मग आपण जातिवाद का पाळतो? कोणत्याही जातीला कनिष्ठ किंवा श्रेष्ठ मानू नये.
 
यावेळी त्यांनी हिंदू समाजासाठी आवश्यक असलेल्या कार्यावर भर दिला. त्यांनी सामाजिक सेवांचा विस्तार, सरकारी कार्यक्रमांचे फायदे शेवटच्या घटकांपर्यंत पोहचले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी गरिबी, निरक्षरता आणि वंचिततेमुळे ग्रस्त असलेल्यांना मुख्य प्रवाहात आणले जावे असे सांगितले.
 
हेही वाचा : State Election Commission : शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही; निवडणूक आयोगाकडून स्पष्ट
 
पारशी समुदायाचे उदाहरण देत सरकार्यवाह म्हणाले की, कठोर परिश्रमाने प्रगती कशी करता येते हे पाहायचे असेल तर पारशी समाजाकडे पाहायला हवे. त्यांनी स्वातंत्र्याच्या वेळी पारशी समुदायाने सरकारकडून कोणत्याही आरक्षणाची मागणी केली नव्हती हे देखील निदर्शनास आणून दिले.
 
बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, घुसखोरीद्वारे राजकीय फायदा मिळवला जात आहे. आज बांगलादेशातील हिंदूंची दुर्दशा लपून राहिलेली नाही. सीमेवरील कुंपण एक मोठे आव्हान आहे आणि कधीकधी आपलेच लोक घुसखोरांना आश्रय देतात. सरकार एसआयआरसह विविध मार्गांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.
 
Powered By Sangraha 9.0