
मुंबई वगळता राज्यातील २८ महानगरपालिकांमध्ये ‘बहुसदस्य पद्धत’ लागू करण्यात येणार आहे. या पद्धतीनुसार, एका प्रभागातून एकाऐवजी चार नगरसेवक निवडले जाणार आहेत.
यावेळी मतदान केंद्रावर २ किंवा ४ ईव्हीएम मशीन उपलब्ध असणार आहेत. मतदारांचा गोंधळ होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका देण्यात येणार आहेत.
‘अ’ गटासाठी – पांढरा रंग
‘ब’ गटासाठी – फिकट गुलाबी रंग
‘क’ गटासाठी – फिकट पिवळा रंग
‘ड’ गटासाठी – फिकट निळा रंग
मतदारांना या सर्व मशीनवर आपले मत नोंदवणे बंधनकारक आहे. मतदार वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मतदान करू शकतात किंवा एकााच पक्षाच्या चारही उमेदवारांना मत देऊ शकतात. कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर ‘नोटा’चा पर्यायही उपलब्ध आहे.
एका जागेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर संबंधित ईव्हीएम मशीनवर लाल रंगाचा दिवा पेटेल. अशा प्रकारे चारही जागांसाठी मतदान केल्यानंतर चौथ्या मतदानानंतर मोठा बझर वाजेल. बझरचा आवाज आला की मतदारांचे मतदान पूर्ण झाल्याचे समजावे.