State Election Commission : शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही; निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

15 Jan 2026 16:04:00
State Election Commission
 
मुंबई : (State Election Commission) बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिले आहे.(State Election Commission)
 
मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली की, निघून जाते, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला गेला. परंतू, बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने (State Election Commission) सांगितले.
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात केवळ विकास चालणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
 
२०११ पासून मार्कर पेनचाच वापर
 
मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (State Election Commission) मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी, तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहनही राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) केले आहे.
 
फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न - आयुक्त दिनेश वाघमारे
 
राज्य निवडणूक (State Election Commission) आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, "याबाबत जे व्हिडीओ समोर आले त्याची सखोल चौकशी करू. एकदा शाई सुकली की, ती निघू शकत नाही. कुणी मुद्दाम फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. प्रत्येक गोष्टीत निवडणूक आयोगाला (State Election Commission) दोष देणे चुकीचे असून मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्षांचीही काही जबाबदारी असते. मतदारांनी बोटाला लावलेली शाई काढू नये. तसे केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणूकीत आम्ही शाईचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे."(State Election Commission)
 
 
Powered By Sangraha 9.0