मुंबई : ( Devendra Fadnavis ) अँटॉपहिल परिसरात प्रभाग क्रमांक १८० मध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून आचारसंहिता बंद झाल्याची तक्रार अपक्ष उमेदवार जान्हवी पाठक यांचे पती नीरज पाठक यांनी केली आहे. " या ठिकाणी पाच टॅक्सी आशा आहेत ज्यावर एक नंबर चे चिन्ह लावून एक विशिष्ट पक्षाचा मतदान दिवशी प्रचार केला जातोय."असा आरोप नीरज पाठक यांनी गुरुवार दि.१५ रोजी केला आहे.
प्रभाग क्रमांक १८० मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये क्रमांक एक नंबर समोर ठाकरे गटाचे उमेदवार स्मिता गावकर यांचं नाव आणि चिन्ह आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून टॅक्सीवर एक नंबर लावून प्रचार केला जात आहे असे पाठक यांचे म्हणणे आहे. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास देखील आणला आहे.अशा पाच टॅक्सी आहेत.पण तक्रारीनंतर हे नंबर काढण्यात आले.
दुसरीकडे बोरीवली मध्ये ठाकरेंच्या भगवा गार्ड आणि पोलिसांत वाद झालेला पाहायला मिळाला. मनसे आणि उबाठाच्या वतीने ,मी मराठी भगवा गार्ड, असे टी-शर्ट घातलेले पथक तयार करण्यात आले होते. मतदान केंद्रावरील शंका बाबत हे पथक कार्यरत करण्यात आले होते.पण तुम्हाला जे काही करायचे आहे ते मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसराच्या बाहेर जाऊन करावे अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली होती. त्यामुळे इथे वाद पाहायला मिळाला.
हेही वाचा : Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्रित मुंबादेवीच्या दर्शनाला; मंत्री आशिष शेलार यांची टीका
भगवा गार्ड यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " ही ब्रिगेड फक्त ठराविक भागातच दिसते,मालवणी भागात का दिसत नाही. दहशत निर्माण करण्याची क्षमता यांच्यात राहिली नाही.दहशत निर्माण केली तर पोलिस ठोकून काढतील. दुबार मतदार शोधण्याचं काम आत बसलेला एजंट करेल. इलेक्शन विभाग करेल.आम्ही पण अशा मतदारांवर ऑब्जेक्शन घेऊ .पण हे मारामाऱ्या करू म्हणणे म्हणजे मतदान कमी झाले पाहिजे यासाठीचा प्रयत्न आहे."
नागपूर मध्ये भाजपा उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी हल्ला केला. यात शिंगणे यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली.
यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"लोकशाहीत निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे चुकीच आहे. कितीही हल्ले केले तरी त्याचा परिणाम होणार नाही लोकशाहीच जिंकेल."