मुंबई : (BMC exit poll results 2026) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC exit poll results 2026) २२७ जागांसह राज्यातील २ हजार ८६९ प्रभागांसाठी मतदान पार पडले आहे. मुंबईतील १७०० उमेदवारांसह राज्यभरात १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर (BMC exit poll results 2026) सर्वांची नजर असणार आहे. मुंबईतील काही मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे दिवसभर आरोप-प्रत्यारोपाने राजकारण ढवळून निघालं आहे. आता १६ जानेवारी रोजी सर्वच महापालिकेचे निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलेलं आहे. मात्र, त्याआधी एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले आहेत. मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? मुंबईचा महापौर महायुतीचा होणार की ठाकरे बंधूंच्या युतीचा होणार? तसेच काँग्रेस आणि वंजित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत एक्झिट पोल्सने काय अंदाज वर्तवले आहेत? कोणत्या एक्झिट पोल्सनुसार कोणत्या पक्षाला किती जागा निवडून येतील? मुंबईत सत्तापालट होणार का ? याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.(BMC exit poll results 2026)
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतचे (BMC exit poll results 2026) आतापर्यंत जेव्हीसी, डीव्ही रिसर्च, अॅक्सिस माय इंडिया, सकाळ आणि जनमत यांचे एक्झिट पोल्सचे कल समोर आले आहेत. या कलानुसार मुंबईत महायुती सत्ता मिळवताना दिसत आहे. मुंबई मनपाच्या २२७ जागांमध्ये बहुमताचा आकडा ११४ आहे. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोल्सच्या(BMC exit poll results 2026) आकडेवारीनुसार महायुतीला यश मिळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(BMC exit poll results 2026)
हेही वाचा : BMC Elections : राज्यभरातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; आज निकाल
एक्झिट पोल्सचे (BMC exit poll results 2026) अंदाज काय आहेत? ते पाहूया...डीव्ही रिसर्च या सर्व्हेनुसार मुंबईत सत्ता परिवर्तनाचे संकेत आहेत. त्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीला १०७ ते १२२ जागा मिळू शकतात तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ६८ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय कॉंग्रेस वंचित आघाडीला १८ ते २५ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २-४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच इतरांच्या खात्यात ८ ते १५ जागा जातील असा अंदाज आहे. या इतरांमध्ये अपक्ष, समाजवादी पक्ष, एमआयएम यांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत त्यात बहुमताचा आकडा पार करण्यासाठी ११४ जागांची गरज आहे. अॅक्सिस माय इंडिया च्या सर्व्हेनुसार, भाजपा - शिवसेना महायुतीला १३१ ते १५१ जागा मिळू शकतात तर ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय काँग्रेस वंचित आघाडीला १२ ते १६ जागा तर इतरांच्या खात्यात ६ ते १२ जागा जातील असा अंदाज आहे. या , मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जेव्हीसी एक्झिट पोलमध्येही महायुतीला १३८ जागा मिळतील असा अंदाज आहे. ४२ जागा असलेल्या मुंबई उत्तर विभागात भाजपला २७-२८ जागा मिळतील त्याशिवाय शिवसेना सुमारे ७-८ जागा मिळवेल असा हा अंदाज आहे. उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना ५९ जागा मिळतील, काँग्रेस वंचित आघाडीला २३ जागा तसेच इतरांच्या खात्यात ७ जागा जातील असा अंदाज आहे. सकाळ एक्झिट पोलमध्ये भाजपला ८४, शिवसेना ३५, उबाठा ६५, मनसे १०, काँग्रेस २० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३ जागा मिळतील , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जनमत एक्झिट पोलमध्ये भाजपा-शिवसेनेला मिळून १३८, ठाकरे बंधूंना ६२ तर काँग्रेस वंचित आघाडीला २० जागा मिळतील , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(BMC exit poll results 2026)
या पाच एक्झिट पोलनुसार (BMC exit poll results 2026) मुंबईत सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवल्याने ठाकरे बंधू यांना मोठा झटका बसेल असं चित्र दिसून येतंय. यानंतर तरी ठाकरे बंधू आत्मपरिक्षण करणार का? या युतीमुळे दुखावलेला सर्वसामान्य कार्यकर्ता आता काय निर्णय घेतो, जागावाटपाचा घोळ करुन उद्धव ठाकरेंनी केलेला मनसेचा गेम आता तरी राज ठाकरेंच्या लक्षात येणारेय का, त्यांचे कार्यकर्ते देत असलेला हा धोक्याचा इशारा राज यांना कळणार आहे.(BMC exit poll results 2026)