मुंबई : (UBT) महापालिका निवडणुकांच्या प्रचारात काँग्रेस–उबाठा आघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये चौका चौकात लावण्यात आलेल्या प्रचार बॅनरवर केवळ काँग्रेसचे पक्षचिन्ह ‘पंजा’ झळकत असून, उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाचे पक्षचिन्ह मात्र पूर्णपणे गायब आहे. (UBT)
या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असले तरी, उबाठाचे नाव किंवा चिन्ह नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यासोबतच, आता या बॅनरचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. (UBT)