Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्रित मुंबादेवीच्या दर्शनाला; मंत्री आशिष शेलार यांची टीका

14 Jan 2026 19:33:46
Thackeray Brothers
 
मुंबई : (Thackeray Brothers) मुंबई महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने राज ठाकरे (Thackeray Brothers) आणि उद्धव ठाकरे (Thackeray Brothers)  एकत्र आले असून बुधवारी दोन्ही कुटुंब एकत्र मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी टीका केली.(Thackeray Brothers)
 
मंत्री आशिष शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "ठाकरे बंधू (Thackeray Brothers) आताच का मुंबादेवीला एकत्र गेलेत? याआधी याआधी दोन्ही ठाकरे बंधू (Thackeray Brothers) मुंबादेवीच्या मंदिरात गेले नाहीत, याचा अर्थ त्यांनी मुंबादेवीच्या भक्तांच्या अपमान केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या पायऱ्या दुरुस्तही केल्या नाहीत. आज त्यांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी मुंबादेवीच्या मंदिराला भेट दिली."(Thackeray Brothers)
 
हेही वाचा : Ravindra Chavan : मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक
 
पराभवाचे कारण दाखवण्याचा प्रयत्न
 
"ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) ज्ञानावर हसावे की, रडावे ते कळत नाही. ते बिनडोकपणाची विधाने करतात. राज ठाकरे तुमचे सल्लागार तुम्हाला फसवत आहेत. तुमचा अभ्यास कच्चा होतो आहे. याआधीही कुणाला उमेदवाराच्या घरी जाण्यास बंदी नव्हती. ठाकरेंना (Thackeray Brothers) पराभव डोळ्यासमोर दिसत असून तो पराभव का झाला, याचे कारण दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या मशीन आधीच आल्या आणि ज्याची माहिती निवडणूक आयोगाने आधीच दिली, तरीही आज त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मतदारांशी संवाद करायला त्यांची पावले जात नाहीत. कारण मतदार त्यांना जवळ घेत नाहीत. तुम्ही आमचा पाठलाग जरूर करा, मतदार तुम्हाला पाठ दाखवतील आणि तुमची वाट लावतील," अशी टीकाही मंत्री आशिष शेलार यांनी केली.(Thackeray Brothers)
 
 
Powered By Sangraha 9.0