Sabarimala gold theft: सबरीमालातील सोने व मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

14 Jan 2026 12:06:27
Sabarimala gold theft 
 
मुंबई : (Sabarimala gold theft) केरळ राज्य मार्गदर्शक मंडळाच्या राज्य कार्यकारिणीने देवस्वोम बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या सबरीमाला यासह विविध मंदिरांमधील सोने व मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या चोरीमागे राजकीय व प्रशासकीय संगनमत असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सबरीमालाचे तंत्री कंडारारू राजीवरारू यांच्या अटकेवर आणि चौकशीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतीही चौकशी निष्पक्ष असली पाहिजे आणि ती राजकीय हेतूंसाठी वापरली जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वामी चिदानंदपुरी (अद्वैताश्रम), स्वामी विवेकामृतानंदपुरी (माता अमृतानंदमयी मठ) आणि स्वामी जितात्मानंद सरस्वती (चिन्मय मिशन) उपस्थित होते. (Sabarimala gold theft)
 
याप्रसंगी सन्यासी समाजाने ठामपणे सांगितले की, पद, अधिकार किंवा ओळख काहीही असो, दोषी आढळणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तसेच हिंदू समाजाने संयम व एकता राखावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. योग्य चौकशी झाली नाही, तर सन्यासी समाज स्वतः आंदोलनाचे नेतृत्व करेल, असा इशाराही त्यांनी दिला. (Sabarimala gold theft)
 
हेही वाचा :  मुंबईत ‘लॅण्ड जिहाद’चा धुमाकूळ!
 
सबरीमळाचे तंत्री कंडारारू राजीवरारू यांच्या अटकेमुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. जर ही अटक राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी किंवा इतर मंदिर चोरीकडे लक्ष वळू नये म्हणून केली गेली असेल, तर ती पूर्णपणे अस्वीकार्य आहे, असे त्यांनी सांगितले. तंत्री यांची उघडपणे चौकशी करणे आणि त्याचवेळी मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन व शंकरदास यांसारख्या राजकीय व्यक्तींशी गुप्त चौकशी होणे हे न्यायसिद्धांतांचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी नमूद केले. चेट्टीकुळंगरा यासह इतर मंदिरांमधूनही चोरीच्या घटना समोर आल्या असून, त्या सर्वांची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. (Sabarimala gold theft)
 
हिंदू समाजाला अस्थिर करण्यासाठी काही लोक नियोजित कटकारस्थान रचत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. एसआयटीकडून 'विधीभंग' या सबबीखाली तंत्रींची अटक संशयास्पद आहे. ज्या राजकीय नेत्यांवर संशय आहे, त्यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्यामुळे भक्तांच्या मनात न्यायप्रक्रियेबद्दल शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Sabarimala gold theft)
 
या बैठकीत स्वामी चिदानंदपुरी (अध्यक्ष), स्वामी सत्स्वरूपानंद सरस्वती (सरचिटणीस), उपाध्यक्ष स्वामी विवेकतानंद सरस्वती व स्वामी अध्यात्मानंद सरस्वती यांच्यासह स्वामी कृष्णात्मानंद सरस्वती, स्वामी जितात्मानंद सरस्वती, स्वामी अय्यप्पदास, ब्रह्मचारी सुधीर चैतन्य, ब्रह्मचारिणी दिशा चैतन्य, स्वामी हंसानंदपुरी, स्वामी शुद्धविग्रहस्वरूप तीर्थपादर, स्वामी हनुमत्पदानंद सरस्वती, स्वामी प्रणवानंद सरस्वती, स्वामिनी विष्णुप्रियानंद सरस्वती आदी उपस्थित होते. (Sabarimala gold theft)
 
 
Powered By Sangraha 9.0