PADU: मुंबई महापालिका निवडणुकीत ‘PADU’ मशीनवरून वाद; राज ठाकरेंची टीका, प्रशासनाचे स्पष्टीकरण

14 Jan 2026 15:17:31
 PADU
 
मुंबई : (PADU) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानास आता काही तास शिल्लक राहिले असतानाच निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ‘PADU’ मशीनवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून यंदा ‘PADU’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता वेगळे यंत्र वापरण्यात येत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. (PADU)
 
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडेतोड टीका करत, “निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असताना अचानक नवीन यंत्र आणणे संशयास्पद आहे,” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले असून मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. (PADU) या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. PADU मशीनचा वापर सरसकट करण्यात येणार नसून, केवळ अपवादात्मक आणि तांत्रिक अडचणींच्या परिस्थितीतच त्याचा वापर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही यंत्रणा मतदानासाठी नव्हे, तर मतमोजणीदरम्यान अडथळे निर्माण झाल्यास पर्याय म्हणून वापरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (PADU)
 
हेही वाचा :  UBT: काँग्रेस–उबाठा आघाडीत खळबळ; प्रभाग क्रमांक ७ मधील बॅनरवरून उबाठाचे चिन्ह गायब
 
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या सरकारी कंपनीने विकसित केलेल्या M3A प्रकारच्या मतदान यंत्रांसोबत PADU युनिट जोडले जाणार आहे. साधारणपणे मतमोजणीसाठी कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडावे लागते. मात्र, काही वेळा तांत्रिक बिघाड झाल्यास PADU युनिटच्या मदतीने कंट्रोल युनिटमधील मते स्वतंत्रपणे वाचता येतात आणि मतमोजणी थांबवावी लागत नाही. (PADU)
 
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेला एकूण १४० PADU मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या यंत्रणेमुळे मतमोजणी प्रक्रियेत वेग, अचूकता आणि पारदर्शकता राखली जाईल, तसेच निकाल जाहीर होण्यास होणारा संभाव्य विलंब टाळता येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, PADU मशीन हा सध्या निवडणूक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. (PADU)
 
 
Powered By Sangraha 9.0