‘मालवणी पॅटर्न’ ‘मुंबई पॅटर्न’ होऊ द्यायचा नसेल तर...!

14 Jan 2026 11:23:58
Malvani Pattern
 
मुंबईच्या मालाड या पश्चिम उपनगरातील एक काळोखा कोपरा म्हणजे मालवणी... इकडचा अंधार विजेअभावी नाही, तर नागरी समस्यांपासून ते अवैध बांगलादेशी घुसखोरी, ड्रग्ज जिहाद, लव्ह जिहाद अशी ही लांबलचक यादी! अवैध घुसखोरांना मतपेढीसाठी वैध मतदार ठरविणारा, सरकारी जमिनींवर कब्जा करुन हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणारा हा ‘मालवणी पॅटर्न.’ तेव्हा, हाच देशविघातक ‘मालवणी पॅटर्न’ भविष्यात ‘मुंबई पॅटर्न’ होऊ द्यायचा नसेल, तर उद्याच्या महापालिका निवडणुकीत जातपात, भाषिक भेदाभेद विसरुन विचारपूर्वक मतदान करणे, हीच मुंबईच्या सुरक्षित भविष्याची गरज!
 
‘लॅण्ड जिहाद’चा विळखा
 
मालवणीत सर्वांत मोठी समस्या म्हणजे ‘लॅण्ड जिहाद’ची. मालवणीतील रस्ते हे अतिक्रमणांच्या विळख्यात पुरते अडकलेले आहेत. अवैध फेरीवाल्यांनी तर अर्धे रस्ते व्यापले आहेत. रस्त्यांची ही अवस्था; तर याहून अधिक घातक अवस्था आहे, ती मालवणीच्या क्रमांक पाच ते क्रमांक सातमध्ये. मालवणीत ७० टक्के सरकारी जमीन आहे. मात्र, आजघडीला मोकळी जमीन नजरेस पडणे दुर्लभच. या सरकारी जमिनींवर अनधिकृत व्यवसाय उभारले गेले, जिथून एकट्या मालवणीतच नाही, तर संपूर्ण मुंबईत ड्रग्जसकट अनेक बेकायदेशीर गोष्टींचा पुरवठा केला जातो. याबरोबरच नागरिकांशी चर्चा केली असता, स्थानिक आमदाराने मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून गाळे उभारल्याचे ते सांगतात. हे गाळे तेथील अवैध मुस्लिमांना व्यवसायासाठी चक्क भाड्याने दिले आहेत. एवढेच नाही तर सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाची येथील पद्धती ठरलेली. सुरुवातीला या मोकळ्या जागेवर कचरा फेकला जातो. तीन ते चार वर्षे कचरा डम्पिंग चालू असल्याचे दाखवल्यानंतर अचानक एखाद्या रात्री ते डम्पिंग काढून त्या ठिकाणी छोटेखानी बांधकाम केले जाते. त्यानंतर कालांतराने त्याठिकाणी मोठे बांधकाम उभारले जाते. असा हा मालवणीतील ‘लॅण्ड जिहाद’चा पॅटर्न पायाखालची जमीन खरोखरीच गायब करणारा!
 
बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा
 
मालाडच्या समुद्रकिनार्‍यावर आधी मोठ्या प्रमाणावर स्थानिक पारंपरिक कोळी समाजाचे मच्छीमार वास्तव्यास होते. मात्र, कमी उत्पन्नाच्या अभावी या पारंपरिक मच्छीमारांनी या भागातून स्थलांतर केले. पारंपरिक मच्छीमारांचे उत्पन्न घटण्यामागचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे, येथील काही मुस्लीम मच्छीमारांनी बांगलादेशातून स्वस्त दरात मजूर मिळवून सुरु केलेला मासेमारीचा व्यवसाय. या मजुरांना राहण्यासाठी जवळच्याच मालवणी भागांत सरकारी जमिनींवर वसवले गेले. यापैकी काही घुसखोर मच्छीमारीव्यतिरिक्त मुंबईतल्या विविध भागांत दिवसभर फिरून अन्यही अवैध उद्योगधंदे करतात आणि रात्री मुक्कामासाठी सुरक्षित मालवणीत परततात. मालवणीत चालणारे सर्व अवैध व्यवसाय याच बांगलादेशी घुसखोरांमार्फत चालवले जातात. या घुसखोरांना स्थानिक आमदाराचे अभय असल्याचा आरोपही येथील रहिवाशांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आजमितीला मालवणीतील ८० टक्क्यांहून अधिक घुसखोरांकडे भारतीय कागदपत्रे आहेत. त्यांना मतांच्या राजकीय लालसेपोटी कागदपत्रे उपलब्ध करून दिली गेली. एकीकडे बांगलादेशातील हिंदू सुरक्षित नाही, तर दुसरीकडे मालवणीतला हिंदू या अवैध घुसखोरांमुळे या परिसरातून पलायन करुन अन्यत्र स्थायिक झाला आहे.
 
मुस्लीम मतदारनोंदणीचा वाढता टक्का
 
मालवणीत दर पाच वर्षांना सुमारे दहा हजार मतदारांची वाढ होत असल्याचे आकडेवारीतूनही सिद्ध होते. पण, ही वाढ फक्त मुस्लीम समुदायाची होत असल्याचे निदर्शनास येते. जर मालवणीतील मतदारांचा टक्का वाढत आहे, तर तो मुस्लीम समुदायाव्यतिरिक्त अन्य समुदायांचादेखील वाढायला हवा; पण याठिकाणी तशी परिस्थिती आढळत नाही. याउलट, अन्य समुदायांची मतदारसंख्या कमी झालेली दिसून येते. या भागात अवैध बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यात आल्याने स्थानिक प्रतिनिधींनी त्यांची मतदारनोंदणी करुन घेतली. या घुसखोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे, स्त्रियांच्या सुरक्षेसाठी हजारो स्थानिक हिंदू मतदारांनी या भागातून पलायन केले आहे. हिंदूंची कमी होणारी लोकसंख्या आणि मुस्लिमांची वाढणारी लोकसंख्या यांमुळे गेली ४० वर्षे या भागांत एकाच समाजाचा प्रतिनिधी पाहायला मिळतो, हे वेगळे सांगायला नको.
 
‘लव्ह जिहाद’मुळे महिला असुरक्षित
 
मालवणीत मुस्लीम समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने हिंदू स्त्रियांची सुरक्षितता हा तेथील मोठा मुद्दा. हिंदू मुलींना शाळेत किंवा महाविद्यालयात जायचे असेल, तर आईवडील किंवा भावाला तिथपर्यंत सोडायला जावे लागते. मालवणीच्या अंबोजवाडी परिसरात तर सायंकाळी ६ वाजल्यानंतर मुलींना घराबाहेर पाठवायला तेथील स्थानिक हिंदूंना भीती वाटते. येथील काही जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिमांकडून जाणीवपूर्वक षड्यंत्र करत हिंदू मुलींना लक्ष्य केले जाते. अनेक मुलींना समाजमाध्यमांवर संदेश पाठवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे षड्यंत्र माहीत नसलेल्या मुली अजाणतेपणी मुस्लीम युवकांवर विश्वास ठेवून त्यांच्या फसव्या प्रेमाला भुलतात. या भागातील काही हिंदू नागरिक ‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी अथक प्रयत्नशील आहेत. मात्र, स्थानिक पुढार्‍यांकडून यावर दबाव टाकून ही प्रकरणे दाबली जातात. या प्रकरणांतून निकाहनंतर त्या मुली धर्मांतरित होतात आणि त्यांना शारीरिक, मानसिक छळाचा सामना करावा लागतो.
 
‘ड्रग्ज जिहाद’चा सापळा
 
मालवणीतील हिंदूंची जी कुटुंबे त्यांचे पूर्वापार संबंध असल्याने आपली घरे सोडून जाण्यास तयार नाहीत, त्यांच्या मुलांना विविध प्रकारचे षड्यंत्र करून पद्धतशीरपणे संपवले जाते. हिंदू मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या, तर हिंदू मुलांना ड्रग्जच्या आहारी ढकलून पिढी संपवण्याचे कारस्थान चालू आहे. मालवणीत ड्रग्जचा मोठा आणि खुला व्यवहार होतो. अंबोजवाडी परिसरात एका हिंदू कुटुंबातील तीनही मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याने त्या कुटुंबाची आज वाताहत झाली. अनेकदा राज्य सरकारच्या आदेशाने पोलिसांनी काही कारवाई केलीच, तर ड्रग्ज सापडू नयेत, यासाठी आता लहान मुलांचा वापर केला जातो, जेणेकरून पोलिसांना या लहान मुलांवर संशय येणार नाही. त्याचबरोबर फक्त मालवणीतच नाही, तर संपूर्ण मुंबईमध्ये याच ठिकाणाहून ड्रग्जचा पुरवठा केला जातो, असेही स्थानिक सांगतात.
 
संविधानाची पायमल्ली
 
मुंबईमध्ये संविधानाची सर्वांत जास्त पायमल्ली कुठे होत असेल, तर ती मालवणीतच! अवैध घुसखोरांमुळे स्थानिक हिंदूंचे जीवन त्रस्त झाले असताना, अल्पसंख्याकांचा समुदाय मात्र मनमानी पद्धतीने वागताना दिसतो. भारतीय संविधान धर्मनिरपेक्षता सांगते, मात्र येथील हिंदूंना सण-उत्सव साजरे करण्यासाठी आजूबाजूच्यांचा विचार करून साजरे करावे लागतात. गणपती आणि नवरात्र यांसारख्या सणांवर रात्री १० वाजेनंतर बंधने घातली जातात. पोलिसांकडून धार्मिक तणावाचे कारण देत मिरवणूक काढण्यास बंदी केली जाते. याउलट, ईद आणि मोहरमला मात्र मध्यरात्री १ वाजेपर्यंत वाजतगाजत मिरवणुका काढल्या जातात. आधीच अतिक्रमणामुळे वाहतुककोंडी झालेली असताना, शुक्रवारी तर रस्त्यावरून नागरिकांना चालण्यासदेखील जागा नसते. त्यामुळे मालवणीत संविधान फक्त नावालाच आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
 
जय भीम, जय मीम?
 
महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज ‘जय भीम, जय मीम’चा नारा देतात. ज्या ठिकाणी मुस्लीम लोकवस्ती कमी असते, त्या ठिकाणी हे नारे मोठ्या आवाजात चालतात. मात्र, मालवणीत मुस्लीम समुदाय दलित बांधवांना देखील हक्काने जगू देत नाही. या ठिकाणी रस्त्यावर नमाज पढत असताना घरात जाण्यास अडचण होते, असे सांगितले असता, एका दलित महिलेला मारण्यासाठी सुमारे २०० मुस्लीम महिला आल्या होत्या. त्या दलित महिलेने तक्रार केली असता, दोन वर्षे त्या महिलेला पोलीस संरक्षण घ्यावे लागले. बाहेर फिरत असताना तर सुरक्षित नाहीच, मात्र घरातदेखील ही मंडळी सुरक्षित राहू शकत नाही, अशी ही भीषण स्थिती. पाणीपुरवठ्यातही भेदभावाचे आरोप स्थानिक करतात आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याचेही ते सांगतात.
 
मुंबईकरांनो, सावधान!
 
मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर. पण, आजवरच्या प्रतिनिधींनी मुंबईची गेल्या ४०-५० वर्षांत दयनीय अवस्था करून ठेवली. वाहतूक, घरांचा प्रश्न, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा, शिक्षण, सुरक्षा आणि रोजगार अशा अनेक गुंतागुंतीच्या समस्या तर आहेतच; परंतु सुजाण मुंबईकरांनी प्रथम हा विचार करायला हवा की, कुटुंब सुरक्षित असेल, तरच या सर्व सोयी-सुविधांना अर्थ आहे. त्यामुळे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहराचा बांगलादेश व्हावा, असे वाटत नसेल, तर मत देताना आपल्या मुला-मुलींच्या सुरक्षित भवितव्याचा विचार करावा. सायंकाळी ६ वाजेनंतरदेखील हिंदू स्त्रिया सुरक्षित घराबाहेर फिरू शकतील, याचा विचार करावा. आपला मुलगा ड्रग्जसारख्या घातक व्यसनांच्या आहारी जाणार नाही, याचा विचार करावा. संविधानाने चालणार्‍या देशाची आर्थिक राजधानीदेखील संविधानानेच चालावी, याचा विचार करावा. मुंबईतील हे घुसखोर कधीही आपले दार ठोठावू शकतात, याचाही विचार करावा. यासाठीच उद्याचे मतदान हे या प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचे पाऊल. त्यामुळे मुंबईकरांनी विचारपूर्वक मतदान केल्यास अधिक स्वच्छ, अवैध घुसखोरमुक्त आणि सुरक्षित मुंबईचे स्वप्न नक्की साकार होईल!
 
 
 
Powered By Sangraha 9.0