मुंबई : (Jilha Parishad Election) राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना, राज्य निवडणूक आयोगाने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यात एकूण २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, या निवडणुकांचा धुरळा खाली बसत नाही तोच आता ग्रामीण भागात नव्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. (Jilha Parishad Election)
राज्यात एकूण १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. (Jilha Parishad Election)
हेही वाचा : खोट्याच्या माथी ‘गोटा’!
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पुढील जिल्ह्यांतील पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. (Jilha Parishad Election)
रायगड – १५
रत्नागिरी – ९
सिंधुदुर्ग – ८
पुणे – १३
सातारा – ११
सांगली – १०
सोलापूर – ११
कोल्हापूर – १२
छत्रपती संभाजीनगर – ९
परभणी – ९
धाराशीव – ८
लातूर – १०
हेही वाचा : मुंबईत ‘लॅण्ड जिहाद’चा धुमाकूळ!
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
– १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
– २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल.
– २७ जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेता येईल.
– त्याच दिवशी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हे जाहीर केली जातील.
– ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल.
– ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषदेसाठी तर दुसरे मत पंचायत समितीसाठी असेल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. राखीव जागांसाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असून, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Jilha Parishad Election)