Illegal Immigration In Mumbai : लोकसंख्या बदलातून मुंबईच्या इस्लामीकरणाचा कट?

14 Jan 2026 16:21:02

Illegal Immigration In Mumbai
 

मुंबई : (Illegal Immigration In Mumbai) कोणत्याही देशाचे अथवा शहराचे भवितव्य त्या देशाची लोकसंख्या ठरवते. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे भवितव्य बदलण्याचा सुनियोजित प्रयत्न होत असून मुंबईच्या इस्लामीकरणाचा (Illegal Immigration In Mumbai) कट रचला जात असल्याचे चित्र निर्माण होऊ लागलेय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) तर्फे मुंबईच्या विविध ६१ भागांमध्ये केलेल्या शास्त्रीय सर्वेक्षणाद्वारे मुंबईतील लोकसंख्याबदल हा नियोजनपूर्वक असल्याचे उघड झाले आहे.(Illegal Immigration In Mumbai)
 

मुंबईमध्ये १९६१ साली हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्के होती, तर मुस्लिम लोकसंख्या अवघी ८ टक्के होती. त्यानंतर २०११ सालच्या जनगणनेनुसार हिंदूंची लोकसंख्या घटून ६७.७ झाली तर मुस्लिम लोकसंख्या २०.६ टक्क्यांनी वाढली होती. आता मात्र २०५१ सालापर्यंत हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज असून अल्पसंख्यांकांची लोकसंख्या मात्र ३० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. परिणामी, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये हिंदू कसेबसे बहुसंख्य ठरण्याची भीती उद्भवली आहे.(Illegal Immigration In Mumbai)
 

टिसतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये उघड झालेली धक्कादायक बाब म्हणजे सर्वेक्षण केलेल्या ७,००० हून अधिक व्यक्तींपैकी ३,०१४ जणांची ओळख अवैध स्थलांतरित (बांगलादेशी आणि रोहिंग्या) म्हणून पटली आहे. या अभ्यासातून सुनियोजित घुसखोरी आणि त्याद्वारे लोकसंख्या बदलाची इकोसिस्टीम स्पष्ट झाली आहे. ओळख पटलेल्या अवैध स्थलांतरितांपैकी ९६% मुस्लिम आहेत. ते मुंबई महानगरपालिकेच्या ५६ प्रभागांमध्ये एकवटले आहेत. ज्यामुळे स्थानिक सामाजिक-राजकीय रचना प्रभावीपणे बदलली आहे. यातूनच प्रवेश निषिद्ध क्षेत्रे तयार झाली आहेत.(Illegal Immigration In Mumbai)
 

जगाचा इतिहास बघितल्यास कोणतेही शहर एका दिवसात कोसळत नाही. प्रथम त्याची ओळख पुसण्यास प्रारंभ होतो. मुंबईमध्येही सध्या तसेच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई सध्या एका गंभीर लोकसंख्याशास्त्रीय धोक्याचा सामना करत आहे.(Illegal Immigration In Mumbai)
 

लोकसंख्या बदलातून गुन्हेगारी जगताचा उदय
 

मुंबईत एकेकाळी अशाचप्रकारे लोकसंख्येत बदल घडवून गुन्हेगारी जगताचा उदय झाला आणि पुढे त्यातूनच इस्लामिक दहशतवादास बळ देण्यात आले होते. दाऊद इब्राहिमपासून ते मेमनपर्यंतचे असे गुन्हेगार लोकसंख्येत बदल झालेल्या भागांमध्येच फोफावले होते, हे विसरता येणार नाही. अनियंत्रित स्थलांतर संघटित गुन्हेगारीसाठी मनुष्यबळ पुरवण्याचे साधन असते. याचे सुरक्षेवर गंभीर परिणाम होतात आणि याचे कारण म्हणजे घुसखोरांना असलेला प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष राजकीय पाठिंबा.(Illegal Immigration In Mumbai)
 

हेही वाचा : PADU: मुंबई महापालिका निवडणुकीत ‘PADU’ मशीनवरून वाद; राज ठाकरेंची टीका, प्रशासनाचे स्पष्टीकरण  
 


मराठी मुस्लीम आघाडी बनवण्याचे स्वप्न
 

उबाठा गटाचे आमदार अनिल परब मराठी मुस्लीम आघाडी बनवण्याचे स्वप्न रंगवत आहेत, हे नुकतेच एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले. त्यांचे म्हणणे असे होते की, उद्धव ठाकरे मुस्लिमांना (Illegal Immigration In Mumbai) विशेष भावतात. मुस्लिम समाजाची पहिली पसंती उबाठा हीच असेल. जर आपण एक भक्कम मराठी मुस्लीम आघाडी यशस्वीपणे उभी करू शकलो, तर ही लढत अगदी सोपी ठरेल.(Illegal Immigration In Mumbai)
 

२०२५ मध्ये वर्षभरात १०६१ बांगलादेशींची हकालपट्टी
 

अवैध बांगलादेशी घुसखोरी विरोधात मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर धडक मोहीम राबवली. या कारवाईत मुंबईतून तब्बल १०६१ बांगलादेशी नागरिकांना शोधून काढत त्यांची हकालपट्टी करण्यात आली. ही कारवाई मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांच्या विविध युनिट्सकडून समन्वयाने करण्यात आली. यावेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य, छोट्या-मोठ्या कामांमध्ये रोजगार, तर काही ठिकाणी झोपडपट्ट्या आणि मजूरवस्त्यांमध्ये वास्तव्य केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली होती.(Illegal Immigration In Mumbai)
 

उद्धव जनाब खुदा का नेक बंदा!
 

समाज माध्यमांवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या प्रचारार्थ मुस्लिम समुदायाद्वारे गोडवे गायल्याचे पाहायला मिळतेय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना या गाण्यामध्ये 'उद्धव जनाब खुदा का नेक बंदा!' असे संबोधले गेलंय. व्हिडिओमध्ये उबाठा पक्षाचे चिन्ह सुद्धा दिसते आहे. या गाण्यावर उद्धव ठाकरेंची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. यापूर्वी एका काँग्रेस खासदाराने जाहीर सभेत उद्धव ठाकरेंसमोर 'प्रत्येक गडकिल्ल्यांवर मशीद असली पाहिजे', असे वादग्रस्त विधान केले होते. तेव्हाही उद्धव ठाकरे व्यासपीठावर मूग गिळून गप्प बसल्याचे पाहायला मिळाले होते.(Illegal Immigration In Mumbai)
 

अवैध बांगलादेशी घुसखोर (Illegal Immigration In Mumbai) भारतात शिरल्यानंतर मुंबईपर्यंत मोठ्या संख्येने येऊन पोहोचले, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्या सर्वांची नेमकी आकडेवारी मांडणे तसे कठीण आहे. कारण प्रत्येकजण चौकशीदरम्यान आपण वेगवेगळ्या राज्यांमधून आल्याचे सांगतात. त्यांच्याजवळ बनावट ओळखपत्र आहेत, ज्या आधारे ते मुंबईत राहतायत. हे पाहता केंद्राने 'वन नेशन वन कार्ड' या स्वरूपातील सोशल सिक्युरिटी कार्डबाबत विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा घुसखोरीची समस्या भेडसावतच राहील.(Illegal Immigration In Mumbai)
- प्रा. एस. के. सिंह, माजी संचालक, आयआयपीएस मुंबई
 
 



Powered By Sangraha 9.0