Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे ५ सरकारी कर्मचारी बडतर्फ

14 Jan 2026 20:06:22
Jammu Kashmir
 
मुंबई : (Jammu Kashmir) जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) राज्यात दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई केली. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या ५ सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईत मोहम्मद इश्फाक, तारिक अहमद शाह, बशीर अहमद मीर, फारुख अहमद भट आणि मोहम्मद युसूफ या पाच सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.(Jammu Kashmir)
 
मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये दहशतवादाविरुद्ध कोणतेही पाऊल खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा जम्मू आणि काश्मीरचे (Jammu Kashmir) उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला आहे. प्रशासनाने आतापर्यंत ८५ सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. तपास संस्थांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे, हे कर्मचारी सार्वजनिक पदांवर असताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विविध दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे उघड झाले.(Jammu Kashmir)
 
हेही वाचा : Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्रित मुंबादेवीच्या दर्शनाला; मंत्री आशिष शेलार यांची टीका 
 
तपास संस्थांना असे आढळून आले की, दहशतवादी संघटना आणि बाहेरील एजन्सींनी वर्षानुवर्षे काही विशिष्ट व्यक्तींना पद्धतशीरपणे सरकारी रचनेत भरती केले होते. असे व्यक्ती प्रशासकीय व्यवस्थेत हळूहळू व्यवस्था कमकुवत करण्यासाठी काम करत होते. भविष्यातील कोणत्याही धोक्यांना रोखण्यासाठी या व्यक्तींना काढून टाकणे हा प्रतिबंधात्मक उपाय केला गेला आहे.(Jammu Kashmir)
 
जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवादाविरुद्ध उपराज्यपालांनी 'झिरो-टॉलरन्स' धोरण कठोरपणे लागू केले आहे. गेल्या पाच वर्षांत, प्रशासनाने केवळ दहशतवाद्यांवरच नव्हे तर त्यांना समर्थन देणारे, निधी पुरवणारे आणि प्रत्यक्ष सरकारी संस्थात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कामगारांवरही सातत्याने कारवाई केली आहे.(Jammu Kashmir)
 
 
Powered By Sangraha 9.0