मृत घोषित आजी जिवंत! दुसऱ्या दिवशी १०३ वा वाढदिवस साजरा...

14 Jan 2026 17:01:23
Declared Dead, 103-Year-Old Found Alive
 
मुंबई : ( Declared Dead, 103-Year-Old Found Alive ) नागपूर जिल्हातील रामटेक शहरात एक थक्क करणारी घटना घडली. १०३ वर्षांच्या गंगाबाई सावजी साखरे यांना मृत समजून त्यांच्यावर अंत्यविधीची तयारी करण्यात आली होती परंतु अवघ्या दोन तासांतच त्यांच्या पायाच्या बोटांची हालचाल दिसून आल्याने कुटुंबियांच्या त्या जिवंत असल्याची बाब लक्षात आली.
 
गेल्या दोन महिन्यांपासून गंगाबाई आजारी असुन पुर्णपणे बेडरेस्टवर होत्या. त्या बोलू ही शकत नव्हत्या. १२ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास त्यांच्या शरीराच्या हालचाल दिसून आली नाही. श्वासोच्धवासही थांबल्यासारखा वाटल्यामुळे कुटुंबियांनी त्यांना मृत समजले व ताबडतोब नातेवाईकांना बोलवले.
 
हेही वाचा : DMK MP Dayanidhi Maran : "तिथल्या महिलांना फक्त चूल आणि मूल...", द्रमुक खासदाराचे उत्तर भारतीय महिलांबद्दल वादग्रस्त विधान!
 
अंत्यसंस्काराच्या वेळी गंगाबाईना नवीन वस्त्रे घालण्यात आली, हात-पायांची बोटे बांधण्यात आली आणि त्यांच्या नाकात कापूस ठेवण्यात आले होते. दरम्यान, नातू राकेश साखरे यांचं लक्ष गेलं आणि अचानक आजीच्या पायाच्या बोटांची हालचाल त्यांना दिसून आली. कुटुंबियांनी लगेचच नाकातले कापुस काढले तसे गंगाबाईंनी जोरात श्र्वास घेतला. ही बाब लक्षात येताच उपस्थित सर्वजणांना आश्चर्याचा धक्काच बसला. विशेष म्हणजे १३ जानेवारीलाच गंगाबाईंचा वा़ढदिवस होता म्हणून घरच्यांनी साधेपणात त्यांचा १०३ वा वाढदिवस ही साजरा केला.
 
Powered By Sangraha 9.0