Avinash Jadhav: बिनविरोध नगरसेवकांवरील याचिका कोर्टाने फेटाळली; अविनाश जाधवांना मुंबई हायकोर्टाचा दणका

14 Jan 2026 12:30:24
 
Avinash Jadhav
 
ठाणे : (Avinash Jadhav) मनसे नेते अविनाश जाधव यांनी महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मंगळवारी १४ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. (Avinash Jadhav)
 
हेही वाचा :  Jilha Parishad Election: महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांची घोषणा; राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापणार
 
सुनावणीवेळी मनसेच्या वतीने बाजू मांडणारे अ‍ॅड. असीम सरोदे यांना हायकोर्टाने स्पष्ट शब्दांत सुनावले. “तुम्ही चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत आहात,” असे नमूद करत न्यायालयाने याचिकेतील मुद्दे कायदेशीर चौकटीत बसत नसल्याचे स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीतील बिनविरोध उमेदवारी ही निवडणूक प्रक्रियेचा भाग असल्याचे संकेतही न्यायालयाने दिले. (Avinash Jadhav)
 
ठाणे महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा आरोप करत मनसेने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. (Avinash Jadhav)
 
 
Powered By Sangraha 9.0