ठाणे : (Thane Municipal Election 2026) ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ (Thane Municipal Election 2026) अंतर्गत बुधवार,दि.१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका (Thane Municipal Election 2026) कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.(Thane Municipal Election 2026)
मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इ.ना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे निवडणूक (Thane Municipal Election 2026) प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(Thane Municipal Election 2026)
हेही वाचा : UBT: काँग्रेस–उबाठा आघाडीत खळबळ; प्रभाग क्रमांक ७ मधील बॅनरवरून उबाठाचे चिन्ह गायब
नागरिकांनी या सुट्टीचा लाभ घेत प्रत्येक पात्र मतदाराने १५ जानेवारी २०२६ रोजी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून निर्भयपणे मतदान करावे आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Thane Municipal Election 2026)