Thackeray Brothers : पोकळ भाषणे करून ठाणेकरांना विकास मिळेल का?

13 Jan 2026 14:56:26
Thackeray Brothers
 
ठाणे : (Thackeray Brothers) ठाण्यात सोमवारी सायंकाळी ठाकरे बंधूंची (Thackeray Brothers) सभा झाली, यावेळी सभेत "उमेदवारांना पैशाची ऑफर दिली " अशा उमेदवाराना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्टेजवर समोर आणून दाखवले, पण त्यांना खरोखरच अशी ऑफर मिळाली का ? असा व्हिडीओ किंवा ऑडिओ क्लिप पुरावा ते सभेत दाखवू शकले नाहीत, यामुळे कालची ठाकरे बंधूंची सभेतून जागृत मतदारांना नक्कीच कळले आहे कि, हि सभा फक्त बोलबच्चन करिता होती. ठाणे शहरातील जागृत मतदारांना चांगले माहिती आहे कि, ठाण्यातील विकास भाजप- शिवसेना महायुतीच करू शकते, ठाण्यातील जनतेला विकास हवा आहे, यावर ठाकरे बंधूंकडे विकासाचे धोरणच नसल्याचे सोमवारच्या ठाकरे बंधूंच्या भाषणातून दिसुन आले.(Thackeray Brothers)
 
ठाण्यात मागील कित्येक वर्ष भाजप -शिवसेना महायुतीची महानगरपालिकेत सत्ता असून शहरात विकासाची कामे सुरु आहेत, हे ठाण्यातील जनतेला देखील चांगले माहिती आहे. निवडणूक आल्या कि ठाकरे बंधू (Thackeray Brothers) भाषणे करण्याकरिता येतात. पण ठाण्यात एखादी मोठी घटना घडली किंवा काही नागरिकांना मदत लागली कि, पहिले भाजप आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधीच धावून येतात हे नागरिकांना चांगले माहिती आहे, यामुळे ठाकरे बंधूंच्या सभेत कितीही बोलबाला झाला असेल तरीही ह्या भूलथापांना जागृत मतदार बळी पडणार नाही. ठाण्यात भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर आहेत ह्यांच्या विकासनिधीतून बरीचशी कामे ठाणे शहरात झाली आहेत तसेच ओवळा- माजिवडा मतदार संघाचे आमदार, परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घोडबंदर येथील परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. याच प्रमाणे कोपरी- पाचपाखाडी मतदार संघाचे आमदार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपाखाडी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात खासदार निधीतून मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.(Thackeray Brothers)
 
हेही वाचा : Supriya Sule: अदानींचे आणि आमचे संबंध खूप जुने! अदानी ग्लॅमरमध्ये नव्हते तेव्हापासून आम्ही त्यांच्या सोबत : सुप्रिया सुळे
 
ठाणेकरांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा सोडवण्याकरिता नवीन योजना येण्याकरिता राज्यातुन आणि केंद्रातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्याप्रमानात ठाण्याला निधी देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या चर्चासत्रात त्यांनी संपूर्ण ठाणे कराना विकासाचा विश्वास पटवून देत सांगितले आहे कि, ठाण्यात रस्ते, जलवाहतूक, मेट्रो, रोजगार, उद्योग, आरोग्य व्यवस्था करिता विकासाची मोठी कामे सुरु आहेत, ह्यातील काही कामे पूर्ण झाली, काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर पुढील काही वर्षात हि कामे पूर्ण होतील. यामुळे ठाण्यात जागृत मतदार आहेत, त्यांना चांगले माहिती आहे, ठाण्यात काम करणारे लोकप्रतिनीधी कोण आहेत आणि वेळ प्रसंगी वैद्यकीय मदत कक्षातून मदत कोण देते. यामुळे ठाकरे बंधूंच्या कालच्या झालेल्या सभेमुळे काहीही फरक ठाण्यातील मतदारावर पडणार नाही. ठाण्यात ज्यांनी विकास केला आणि अडचणीच्या काळात मदतीला कोण धावून येते आणि कुठला आमदार लगेचच नागरिकांना उपयोगी पडतो, हे ठाण्यातील जनतेला चांगले माहित आहे. यामुळे जागृक जनता विकासाकरिता नक्कीच योग्य पक्षाला मतदान करेल असे दिसत आहे.(Thackeray Brothers)
 
"लाव रे तो व्हिडीओ" :
 
राज ठाकरे (Thackeray Brothers) यांनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडत मनसे पक्ष स्थापन केला, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीकेची धाड केली होती, तो व्हिडीओ सोशिअल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, तेच राज ठाकरे आता शिवसेना (उबाटा) आणि मनसे युती बद्दल बोलत आहेत, यामुळे जनतेला देखील कळले आहे, कि ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एकत्र कशाकरिता आले आहेत, मुळात शिवसेना उबाटा गट सोबत असलेले ठाण्यातील तीन माजी नगरसेवक सोडले तर सर्वच माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गट -भाजप महायुतीतुन महापालिकेची निवडणूक लढवत असून महायुतितुन कार्य करत आहेत. यामुळे आता शिवसेना उबाटा गटाचे महानगरपालिकेत खाते उघडते कि, नाही हेच आता महानगरपालिकेचा निकाल लागल्यावर कळणार आहे. मनसेचा तर मागील कित्येक महापालिका निवडणूकित ठाणे शहरात सुपडा साफच आहे. यामुळे यंदा देखील मनसेचे खाते उघडते का? हे निवडणूक निकाल लागल्यावरच कळेल.(Thackeray Brothers)
 
 
Powered By Sangraha 9.0