मुंबई : (Trump Tariff News) अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के आयातशुल्क म्हणजेच टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांसह भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ लादला जाण्याची शक्यता आहे. (Trump Tariff News)
'इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अशा देशांवर २५ टक्के एवढा टॅरिफ लादला जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, टुथ सोशलवर पोस्ट करत, "इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारांवर २५ टक्के कर भरावा लागेल. हा नियम तात्काळ लागू होईल आणि बदलला जाणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. (Trump Tariff News)
इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सरकारविरोधी आंदोलने सुरु आहेत.आंदोलन मोडून काढण्यासाठी इराणने केलेल्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत ६०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आता इराणला आर्थिक कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफ अस्त्राचा वापर केला आहे. इराणसोबत व्यापारामध्ये सर्वाधिक व्यापार करणाऱ्या देशांमध्ये चीनचा नंबर लागतो, त्यानंतर इराक, यूएई, तुर्कस्थान आणि भारत या देशांचा क्रमांक लागतो. (Trump Tariff News)