ठाणे : (Local Body Elections) ठाणे जिल्हापरिषदेमध्ये ५० टक्यांच्या वर आरक्षण गेल्यामुळे निवडणूक (Local Body Elections) कार्यक्रम जाहीर झाला नाही, यामध्ये सुप्रीम कोर्टात जिल्हापरिषद, पंचायत समिती बद्दल याचिका दाखल असल्याने राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषदांपैकी २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे या २० जिल्हा परिषदा वगळून इतर ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यामध्ये कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, आणि लातूर या १२ जिल्हापरिषद येथे निवडणूक होत आहेत.(Local Body Elections)
हेही वाचा : Local Body Elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले
या व्यतिरिक्त जिल्हापरिषद निवडणुकीबाबत (Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले नाहीत, निर्देश दिले कि, त्यानुसार निवडणूक (Local Body Elections) घेतल्या जातील असे निवडणूक विभागाने मुंबई येथील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तसेच सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीची तारीख २१ जानेवारी आहे, यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानतंर इतर जिल्हापरिषदमध्ये निवडणूक (Local Body Elections) होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्हापरिषद तसेच शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ अशा पाच पंचायत समिती आहेत. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच ठाणे जिल्हापरिषद, पंचायत समितीची निवडणुकीची तारीख अंतिम होणार आहे.(Local Body Elections)