KDMC Election : केडीएमसी निवडणूकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

13 Jan 2026 20:41:41
KDMC Election
 
कल्याण : (KDMC Election) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी (KDMC Election) महापालिका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, या सार्वत्रिक निवडणूकीत ३१ पॅनलमध्ये बहुसदस्य पध्दतीने निवडणूक संपन्न होणार आहे.(KDMC Election) या निवडणूकीसाठी १५४८ मतदान केंद्रांवर आणि ३८२ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. यापैकी १०१३ मतदान केंद्रे तळ मजल्यावर, ९ मतदान केंद्रे पहिला मजल्यावर, ४७१ मतदान केंद्रे पार्टीशन स्वरुपात, ५५ मंडपात असणार आहेत.(KDMC Election)
 
महापालिका क्षेत्रात एकुण १४,२५,०८६ इतकी मतदारांची संख्या असून, त्यापैकी एकुण ७,४५,६६४ पुरुष मतदार, एकुण  ६,७८,८७० स्त्री मतदार व इतर मतदारांची संख्या ५५२ इतकी आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची (KDMC Election) मतमोजणी एकुण ८ ठिकाणी (निवडणूक निर्णय अधिकारी २ व ४ ची मतमोजणी एका ठिकाणी) होणार आहे.(KDMC Election)
 
हेही वाचा : BMC Elections : मुंबईत मतदान आणि मतमोजणी केंद्र परिसरात विशेष स्वच्छता मोहीम 
 
१. निवडणूक निर्णय अधिकारी - १ यांचेकडील पॅनल क्रमांक – २, ३ व ४ ची मतमोजणी बिर्ला वन्य, केडीएमटी इमारत, तळ मजला, शहाड (पश्चिम).
 
२. निवडणूक निर्णय अधिकारी - २ यांचेकडील पॅनल क्रमांक – १, ५, ६ व १० ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).
 
३. निवडणूक निर्णय अधिकारी - ३ यांचेकडील पॅनल क्रमांक – ७, ८ व ९ ची मतमोजणी प्रभाग क्षेत्र 3/क चे कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र,‍ आधारवाडी, कल्याण (‍पश्चिम).
 
४. निवडणूक निर्णय अधिकारी - ४ यांचेकडील पॅनल क्रमांक – ११, १२ व १८ ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).
 
५. निवडणूक निर्णय अधिकारी - ५ यांचेकडील पॅनल क्रमांक – १८, १४, १५ व १६ ची मतमोजणी साकेत कॉलेज, 100 फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, काटेमानिवली, कल्याण (पूर्व).
 
६. निवडणूक निर्णय अधिकारी - ६ यांचेकडील पॅनल क्रमांक – २०, २६, २७ व २८ ची मतमोजणी आयईएस पाटकर विद्यालय, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या स्टील्ट हॉलमध्ये.
 
७. निवडणूक निर्णय अधिकारी - ७ यांचेकडील पॅनल क्रमांक – २१, २२, २३ व २५ ची मतमोजणी कडोंमपा शाळा क्र. 20, रेती बंदर रोड, मोठा गांव, डोंबिवली (पश्चिम).
 
८. निवडणूक निर्णय अधिकारी - ८ यांचेकडील पॅनल क्रमांक – २९ व ३० ची मतमोजणी धनजी नानजी चौधरी विद्यालय हॉल, पहिला मजला, नांदीवली, डोंबिवली (पूर्व).
 
९. निवडणूक निर्णय अधिकारी - ९ यांचेकडील पॅनल क्रमांक – १७, १९ व ३१ ची मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व).
 
 
Powered By Sangraha 9.0