BMC Elections : महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या

13 Jan 2026 19:09:11
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) राज्यभरात तब्बल ९ वर्षांनंतर होत असलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी (BMC Elections) मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या.(BMC Elections)
 
गेल्या महिनाभरापासून महापालिका निवडणूकांच्या (BMC Elections) प्रचाराची लगबग सुरु असून १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची मुदत संपली. दरम्यान, विविध राजकीय नेत्यांच्या दिवसभर सुरु असलेल्या प्रचार सभा, मुलाखती, रॅली, स्पीकर्स, गल्लोगल्ली वाजत फिरणारे भोंगे आता बंद झाले आहेत. महापालिकेसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर, १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होतील. या निवडणूकीसाठीचा (BMC Elections) प्रचार थांबला असून सर्वांना निवडणूकीची उत्सुकता लागली आहे.(BMC Elections)
 
हेही वाचा : Ameet Satam : ठाकरेंनी मराठी तरुणांना फक्त वडापावच्या गाडीपर्यंत सिमित ठेवले - अमीत साटम 
 
मुदत संपल्यानंतरही उमेदवाराला प्रचार करता येणार
 
प्रचाराची मुदत संपली असली तरी उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो, असा नियम राज्य निवडणूक आयोगाने सांगितला. निवडणूक (BMC Elections) आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, "निवडणूकीच्या (BMC Elections) ४८ तासांआधी प्रचार समाप्त होतो. त्यानुसार, १३ तारखेला साडेपाच वाजतानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही. प्रचाराच्या काही कॅटेगिरी आहेत. सभा, मिरवणूक, रॅली हे सर्व प्रकार साडे पाचनंतर बंद होतील. पण उमेदवार व्यक्तिगत घरोघरी जाऊन भेटी देऊ शकतात. यामध्ये कुठलेही नियम बदलले नाहीत. लोकसभा आणि विधानसभेतही तेच नियम होते. एकटा उमेदवार घरोघरी जाऊन चर्चा करू शकतो. पाचपेक्षा जास्त लोक डोअर टू डोअर गेले तर नियमभंग आहे. या काळात पैसे वाटप केल्यास आम्ही कारवाई करू," असे त्यांनी सांगितले.(BMC Elections)
 
 
Powered By Sangraha 9.0