मुंबई : (Reiki Book Launch) ज्येष्ठ रेकी शिक्षक व उपचारतज्ज्ञ डॉ. गणेश कदम लिखित 'रेकी – यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली' या पुस्तकाच्या (Reiki Book Launch) तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच उत्साहात पार पडले.३० वर्षांहून अधिक अनुभवावर आधारित हे पुस्तक (Reiki Book Launch) रेकीला केवळ उपचारपद्धती म्हणून नव्हे, तर तणाव व्यवस्थापन, स्पष्ट निर्णयक्षमता आणि संतुलित यशस्वी जीवनासाठी उपयुक्त जीवन कौशल्य म्हणून मांडते.(Reiki Book Launch)
हेही वाचा : Vasai Fort : वसई किल्ल्यावर सात संस्थांची संयुक्त संवर्धन मोहीम
या पुस्तकाचे (Reiki Book Launch) प्रकाशन पोलीस उपनिरीक्षक सोनाली घाडगे, अधिवक्ता डॉ. पल्लवी दिवेकर, यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी मराठी उद्योजक प्रणव कदम, कल्पा पेथर , श्रुती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा मराठी उद्योजक संघटना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या दादर चॅप्टर मध्ये करण्यात आला.या पुस्तक प्रकाशनाचा (Reiki Book Launch) एक विशेष सामाजिक पैलू म्हणजे, या दिवशी झालेल्या संपूर्ण पुस्तक (Reiki Book Launch) विक्रीतून मिळालेली रक्कम सामाजिक संस्थेला देण्यात आली. ही संपूर्ण रक्कम आनंदवन, वसई या सेवाभावी संस्थेला योगदान स्वरूपात अर्पण करण्यात आली.ज्ञानाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थित वाचक आणि मान्यवरांनी विशेषतः कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.(Reiki Book Launch)