मुंबई : (Ameet Satam) ठाकरेंनी आतापर्यंत मराठी तरुणांना फक्त वडापावच्या गाडीपर्यंत सिमित ठेवले, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम (Ameet Satam) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर केली आहे. (Ameet Satam)
पत्रकार परिषदेत बोलताना आ. अमीत साटम (Ameet Satam) म्हणाले की, "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत ठाकरे बंधूंचा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा जनतेच्या समोर उघड केला. त्यामुळे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझा उद्योगांना विरोध नाही, परंतू, उद्योग करत असताना कमी वेळात एखादा माणूस मोठा होतो हा माझा विषय होता, असे ते म्हणाले. (Ameet Satam) गेल्या १० वर्षात राबवलेल्या विविध योजनांतून मराठी तरुणांना उद्योजक तयार करून देण्याची नीती राज्य आणि केंद्र सरकारने राबवली. सर्वात जास्त स्टार्टअप मुंबई शहरातून नोंदवले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मराठी तरूणांनी सुरु केलेल्या स्टार्टअपची नोंद आहे. आम्हाला मराठी तरुणांना उद्योजक करायचे आहे. याऊलट ठाकरेंनी आतापर्यंत मराठी तरुणांना फक्त वडापावच्या गाडीपर्यंत सिमित ठेवले." (Ameet Satam)
"मराठी तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी ठाकरेंनी शिव उद्योग सेना स्थापन केली होती. या शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून किती मराठी तरुणांना उद्योजक केले? याचे उत्तर राज ठाकरेंनी द्यावे. मराठी तरुणांच्या नावाने मोठमोठे कार्यक्रम करायचे, पैसे जमा करायचे आणि नंतर गायब व्हायचे, हीच नीती गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांनी अवलंबली आहे. मराठी माणूस काम करत असलेल्या गिरण्यांमध्ये कोहिनूर मिल होती. ही मिल बंद पडल्यानंतर तिथे तयार झालेल्या कोहिनूर स्क्वेअर नावाच्या मॉलमध्ये किती मराठी तरुणांना रोजगार दिला? किंवा मातोश्री डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेल्या किती गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये किती मराठी लोकांना घरे दिली, यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल," असेही ते म्हणाले. (Ameet Satam)
हेही वाचा : Mumbai Linguistic Politics : मुंबईच्या राजकारणात पुन्हा भाषिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न; दक्षिण भारतीयांचा अपमान ठाकरे बंधूंना भोवणार?
तुमच्या नातवाला बालमोहन विद्यामंदिरात प्रवेश द्या
"तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेसाठी आग्रह धरता, पण मग तुमची मुले बॉम्बे स्कॉटिशमध्ये का शिकले? तुमची मुले शाळा-कॉलेजमध्ये मराठी बाजूला ठेवून जर्मन आणि फ्रेंच का शिकले? मराठी माणसाचे मन समुद्राइतके अथांग आणि आभाळाएवढे मोठे आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत जे लोक येतात त्यांना एकाच छताखाली सामावून घेण्याचे काम मराठी माणूस करतो. या मराठी माणसाच्या मोठ्या मनाला बदनाम करण्याचे काम राज ठाकरे करतात. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या नातवाला बालमोहन विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेऊन दाखवावा, असे माझे त्यांना चॅलेंज आहे," असेही ते म्हणाले. (Ameet Satam)
आम्ही आमच्या मताशी पक्के
"आम्ही आमच्या मताशी पक्के आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सरकारमध्ये असला तरी नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी आम्हाला मान्य नाही. मग अदानींबद्दल तुमचे मत पक्के आहे, तर त्यांना घरी आणून गळाभेटी का करता? ही दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका आहे," अशी टीकाही अमीत साटम (Ameet Satam) यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. (Ameet Satam)