कल्याण-डोंबिवली : (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी एकत्र आलो असल्याचे सांगत आहेत. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेकडून दिलेल्या एका उमेदवारीमुळे त्यांच्या वक्तव्यांवरच प्रश्न निर्माण होत आहे. (Raj Thackeray)
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक २६ डीमध्ये मनसेकडून प्रतिक पोपटलाल मारू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिक मारू हे गुजराती समाजातून येतात. यामुळे “अजेंडा मराठीचा, पण उमेदवार गुजराती?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान मराठी भाषेचा मुद्दा मांडला जात असताना काही ठिकाणी प्रचार साहित्य आणि संवाद गुजराती भाषेत होत असल्याचा आरोपही केला जात आहे. (Raj Thackeray)
राज ठाकरे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढत असल्याचे सांगतात. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेतही मराठी मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. मात्र, अशा पार्श्वभूमीवर गुजराती उमेदवाराला तिकीट दिल्याने मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Raj Thackeray)