कल्याण : (Pankaja Munde) नगरपालिका निवडणूका नुकत्याच पार पडल्या असून त्यात जनतेने आम्हालाच कौल दिला असून कोणीही एकत्र आले तरी महानगरपालिका निवडणूकीमध्ये जनता भाजपा- शिवसेनेलाच निवडून देईल असा विश्वास राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कल्याणात व्यक्त केला.(Pankaja Munde)
कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विजया पोटे, संदीप गायकर, हेमलता पवार, शामल गायकर, पराग तेली आणि अमित धाक्रस यांच्या प्रचारासाठी परदेशी मैदानावर झालेल्या जाहीरसभेत त्या बोलत होत्या.(Pankaja Munde)
मुंडे म्हणाल्या,(Pankaja Munde) केडीएमसीमध्ये महायुतीचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे केडीएमसीची निवडणूक ही आम्हीच जिंकणार असून याबाबत कोणाच्या मनात काही शंका असू नये. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असून दोघांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान देण्याचे काम केले आहे. ज्या भावांनी तुम्हाला हा सन्मान मिळवून दिला आहे त्याला तुम्ही विसरणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकार राज्य सरकारप्रमाणो महानगरपालिकेतही भाजपा, शिवसेना महायुतीचेच सरकार निवडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Pankaja Munde)
हेही वाचा : BMC Elections : महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या
केडीएमसीच्या विकासासाठी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार विजया पोटे, संदीप गायकर, हेमलता पवार, शामल गायकर, पराग तेली आणि अमित धाक्रस यांनी भरघोस मतांनी निवडुन देण्याचे मुंडे यांनी आवाहान केले. दरम्यान या सभेनंतर वंजारी समाजाच्या वतीने महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिब्याचे पत्र यावेळी संघटनेच्या पदाधिका:यांकडून मंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले.(Pankaja Munde)
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक अरविंद पोटे, सुप्रसिध्द बांधकाम व्यावासायिक मंगेश गायकर, प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या प्रिया शर्मा यांच्यासह अनेक मान्यावर उपस्थित होते.(Pankaja Munde)