आत्ता बोला! धारावी प्रकल्पाचं टेंडर उद्धव ठाकरेंच्या काळातच अदानीला! देवाभाऊंनीच केली पोलखोल

13 Jan 2026 12:48:39

CM Devendra Fadnavis

मुंबई : (CM Devendra Fadnavis)
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळण्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचेच निर्णय कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सोमवारी १२ जानेवारीला ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.(CM Devendra Fadnavis)

अदानींना प्रकल्प कसा मिळाला?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "लुटीची संधी हुकल्यामुळेच आता काहीजण अरण्यरुदन करत आहेत. धारावी पुनर्विकासाची संकल्पना १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती. त्यानंतर २०१४ नंतर युती सरकारने या प्रकल्पाला गती दिली. ते पुढे म्हणाले की, युती सरकारच्या काळात धारावी प्रकल्पाची निविदा अदानी समूहाव्यतिरिक्त दुसऱ्या विकासकाला देण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ही निविदा रद्द करून नव्याने निविदा काढली आणि त्यावेळी अदानी समूहाने बोली जिंकली.(CM Devendra Fadnavis)

उद्धव सरकारने निविदा रद्द केल्यानंतर नव्या अटी व शर्ती घातल्यामुळे मोठा टीडीआर घोटाळा होण्याची शक्यता होती, मात्र विद्यमान सरकारने टीडीआरवर मर्यादा घालून हा धोका टाळल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी केला. "त्यांच्या हातात असतं तर त्यांनी धारावी लुटली असती. लुटीची संधी हुकल्यामुळेच ते अरण्यरुदन करत आहेत. हे भंग झालेले प्रेमी आहेत” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.(CM Devendra Fadnavis)

Powered By Sangraha 9.0