नागपूर : (Devendra Fadnavis) महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून अखेरच्या टप्प्यात जोरदार शक्तिप्रदर्शन आणि आक्रमक प्रचार केला जात आहे. नागपूर शहरातही भाजपकडून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली असून, या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सहभागी झाले होते. (Devendra Fadnavis)
हेही वाचा : Supriya Sule: अदानींचे आणि आमचे संबंध खूप जुने! अदानी ग्लॅमरमध्ये नव्हते तेव्हापासून आम्ही त्यांच्या सोबत : सुप्रिया सुळे
विशेष म्हणजे या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बाईक चालवत सहभाग नोंदवला. भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीत निघालेल्या या बाईक रॅलीमुळे नागपूरच्या राजकीय वातावरणात चांगलाच उत्साह निर्माण झाला. शहरातील विविध भागांतून ही रॅली काढण्यात आली असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. (Devendra Fadnavis)
दरम्यान, येत्या १५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी, मुंबईसह, एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रचाराची वेळ असल्याने, नेते आणि उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. (Devendra Fadnavis)