Budget 2026 : इतिहासात पहिल्यांदाच 'रविवारी' सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर!

13 Jan 2026 12:59:08

Budget 2026
 
मुंबई : ( Budget 2026 ) केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ येत्या १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, केंद्रीय वित्तमंत्री सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडतील.( Budget 2026 )

दरवर्षी अर्थसंकल्प  १ फेब्रुवारीला सादर केला जातो. मात्र, यावर्षी १ फेब्रुवारीला रविवार असल्याने यंदा अर्थसंकल्प त्याच तारखेला सादर होणार की तारीख बदलणार, याबाबत चर्चा होत होती. तसेच रविवारीच अर्थसंकल्प ( Budget 2026 ) सादर होणार असल्यास त्या दिवशी शेअर बाजार सुरू राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. या सर्व चर्चांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पूर्णविराम देत अर्थसंकल्प २०२६-२७ ( Budget 2026 ) १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होऊन २ एप्रिलपर्यंत चालणार असल्याचेही सांगितले. या अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीला संपेल, तर दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होईल. जो २ एप्रिल रोजी संपेल.( Budget 2026 )

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, हे अधिवेशन अर्थपूर्ण चर्चा आणि लोककेंद्रित प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.( Budget 2026 )


Powered By Sangraha 9.0