रविंद्र चव्हाण यांच्यावरील टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर

13 Jan 2026 15:44:34
Ravindra Chavan
 
मुंबई : ( Ravindra Chavan ) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लुंगी नेसून प्रचार सभेला गेल्याच्या वरून संजय राऊत यांनी जी टीका केली त्याला भाजपाच्या वतीने सडेतोड उत्तर दिले आहे.
 
महायुतीच्या शिवतीर्थ येथील सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लुंगी घातली होती.त्यावरून टीका टिपणी केली जात होती.याला उत्तर देताना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या एक्स हँडलवरून म्हटले आहे की,"संजय राऊतजी ,हा तुमच्या आमच्यातील संस्कृतीतील फरक आहे.
 
हेही वाचा : Raj Thackeray: अजेंडा मराठीचा, प्रचार गुजरातीत? कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या उमेदवारीवरून नवा वाद
 
आपली तब्येत बिघडली तेव्हा पंतप्रधानांपासून सर्वांनी आपल्याला लवकर बरे व्हा या शुभेच्छा दिल्या.आपण मात्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या गुडघेदुखीच राजकारण करीत आहात. अर्थात सोनिया राहूल-शरद पवारांसमोर गुडघे घासून ज्यांची वाटीच संपली त्यांना या वेदना काय कळणार?"
 
रविंद्र चव्हाण यांच्या गुडघे दुखी त्रासावरून विरोधक राजकारण करीत असल्याचे यात केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
 
Powered By Sangraha 9.0