Mumbai Linguistic Politics : मुंबईच्या राजकारणात पुन्हा भाषिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न; दक्षिण भारतीयांचा अपमान ठाकरे बंधूंना भोवणार?

13 Jan 2026 16:44:34
Mumbai Linguistic Politics
 
मुंबई : (Mumbai Linguistic Politics) "हटाओ लुंगी, बजाओ पुंगी असे बाळासाहेब म्हणाले होते ते यांच्यासाठीच," असा संदर्भ देत राज ठाकरे यांनी तामिळनाडूचे भाजप नेते अन्नामलाई यांच्यावर टीका केली. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर निवडणूकीच्या निमित्ताने मुंबईच्या राजकारणात पुन्हा भाषिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न? होतोय का? असा प्रश्न उपस्थित होतो.(Mumbai Linguistic Politics)
 
खरेतर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वास्तव परिस्थितीवर बोलणे आणि त्यांच्या शब्दांची धार ही त्या त्या काळापुरती मर्यादित होती. परंतू, आता पुन्हा त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत कुठेतरी भाषिक राजकारण (Mumbai Linguistic Politics)  करण्याचा प्रयत्न दिसून येतो. मुंबई ही मराठी माणसांची आहे, याबाबत कुणाचेही दुमत नाही. मात्र, त्याचवेळी या शहरात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी, गुजराती, उत्तर भारतीय असे विविध समाजही एकत्रितपणे राहतात हे सत्य नाकारून चालणार नाही.(Mumbai Linguistic Politics)
 
मुंबईत माटुंगा, सायन-कोळीवाडा, भांडुप, विक्रोळी, धारावी, कांदिवली, बोरिवली, मालाड अशा अनेक प्रभागांमध्ये दक्षिण भारतीय मतदारांचा प्रभाव निर्णायक आहे. मुंबईत राहणारे दक्षिण भारतीय लोक प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिक, कॉर्पोरेट अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. अशा परिस्थितीत एखाद्या विशिष्ट पोशाख किंवा ओळखीवरून राजकीय भाष्य करणे, साहाजिकच संवेदनशील ठरते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे मुंबईत राहणाऱ्या दक्षिण भारतीय समाजाची नाराजी होऊन त्यांच्या मतांचाही परिणाम होऊ शकतो.(Mumbai Linguistic Politics)
 
हेही वाचा : Raj Thackeray: अजेंडा मराठीचा, प्रचार गुजरातीत? कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या उमेदवारीवरून नवा वाद 
 
मराठीसाठी एकत्र आलो असे सांगताना राज ठाकरे यांच्या भाषणातून जुन्या भाषिक संघर्षाच्या चौकटीत अडकत असल्याचा ठसा उमटतो. रोजगार, वाहतूक, घरबांधणी, भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांऐवजी भावनिक घोषणांकडे त्यांचा कल अधिक दिसतो. यावेळी त्यांनी दक्षिण भारतीय लोकांच्या सांस्कृतिक अस्मितेवर टीका करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीत दक्षिण भारतीय मतदार आपल्या मतदानातून राज ठाकरेंनी केलेल्या अपमानाचा बदला घेतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.(Mumbai Linguistic Politics)
 
"मुंबईत १०० वर्षांपासून लाखों दक्षिण भारतीय लोक इथे राहतात. मुंबईच्या विकासात दक्षिण भारतीय लोकांचाही वाटा आहे. राज ठाकरे यांचे राजकारण संपत असल्याने ते असे चुकीचे वक्तव्य करतात. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि सदैव राहणार, हे कुणीही नाकारू शकत नाही. पण मुंबई हे आंतराराष्ट्रीय शहरसुद्धा आहे, असे वक्तव्य अण्णामलाई यांनी केले. परंतू, राज ठाकरे यांनी केलेले विधान चुकीचे असून याचा परिणाम नक्की निवडणूकीत होईल. (Mumbai Linguistic Politics) मराठी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय हे सगळे हिंदु एकच आहे. दक्षिण भारतीय हिंदू लोक नक्कीच त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देतील."(Mumbai Linguistic Politics) 
- श्रीराज नायर, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद
 
"राज ठाकरेंचे हे वक्तव्य चुकीचे आहे. त्यांच्या काकांच्या काळ आता संपला आहे. परंतू, त्याकाळात ते जे बोलले ते आता बोलणे चुकीचे आहे. संपूर्ण तामिळ समाज त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपचे नेते अण्णामलाई हे आयपीएस अधिकारी आहेत. ते चुकीचे बोलू शकत नाहीत. पण राज ठाकरे स्वत:च्या मनाने काहीही बोलत असून हे योग्य नाही. यामुळे मशाल आणि इंजिनाची मते कमी होतील."(Mumbai Linguistic Politics)
- अरुणाचलम स्वामीनाथन, भाजप नेते
 
 
Powered By Sangraha 9.0