मुंबई : (BMC Elections) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, गुरुवार दिनांक १५ जानेवारी रोजी महानगरपालिका निवडणूकीसाठी (BMC Elections) मतदान होणार आहे. या निमित्ताने, मुंबई महानगरातील सर्व मतदान केंद्रांवर तसेच मतमोजणी केंद्रांवर उत्तम प्रकारची स्वच्छता राहावी, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १४ ते १६ जानेवारी २०२६ रोजी राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेच्या माध्यमातून मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र तसेच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.(BMC Elections)
बृहन्मुंबई क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणांवर उत्तम प्रकारची स्वच्छता ठेवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना केल्या जातात. तसेच, विविध उपक्रमांचेही आयोजन केले जाते.(BMC Elections)
हेही वाचा : Palika Election: उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना १५ जानेवारीला भरपगारी सुट्टी
याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिका निवडणूकीच्या (BMC Elections) अनुषंगाने, मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ जानेवारी रोजी, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजेच दिनांक १५ जानेवार रोजी मतदान केंद्रांवर तसेच दिनांक १६ जानेवारी रोजी मतमोजणी केंद्र आणि परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदानासाठी निश्चित केलेल्या सर्व १० हजार २३१ मतदान केंद्रांवर तसेच २३ मतमोजणी केंद्रांवर या मोहीम अंतर्गत स्वच्छता करण्यात येईल.(BMC Elections)
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विविध मतदान केंद्रांच्या ठिकाणी सुमारे ४ हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना अत्यंत सुलभतेने मतदान करता यावे. तसेच त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी महानगरपालिकेकडून (BMC Elections) विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.(BMC Elections)