Sanjay Raut Criticism : "संजय राऊतांना दाखवला आरसा! आदित्य ठाकरेंनी मतांसाठी लुंगी घातली तर कशी चालते?"

13 Jan 2026 17:37:29
 
Sanjay Raut Criticism
 
मुंबई : (Sanjay Raut Criticism) "जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते," असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संजय राऊत (Sanjay Raut Criticism) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच आदित्य ठाकरेंचा लुंगी परिधान केलेला फोटोही त्यांनी शेअर केला.(Sanjay Raut Criticism)
 
सोमवारी पार पडलेल्या महायुतीच्या सभेत रवींद्र चव्हाण एका विशिष्ट पेहरावात आले होते. यावरून संजय राऊत (Sanjay Raut Criticism) यांनी त्यांचा फोटो पोस्ट करत टीका केली. तसेच त्यांनी तो फोटो अण्णामलई यांच्या प्रकरणाशी जोडला. यावरून पलटवार करताना रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचा दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसलेला फोटो शेअर केला.(Sanjay Raut Criticism)
 
हेही वाचा : Local Body Elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले 
 
रवींद्र चव्हाण म्हणाले की, "गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारदरम्यान झालेली दुखापत हे त्याचे मुख्य कारण आहे. मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः हे विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत, म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन."(Sanjay Raut Criticism)
 
"राहिला प्रश्न टीकेचा, तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखे काही नसते ते असली विधाने करत असतात. मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहेच. बाकी संजय राऊत (Sanjay Raut Criticism) यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा," असेही ते म्हणाले.(Sanjay Raut Criticism)
 
 
Powered By Sangraha 9.0