मुंबई : (Thackeray Brothers) रविवार दि.११ रोजी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवाजी पार्क येथे पार पडली. यावेळी नेहमी प्रमाणे मुंबई तोडण्याची खोटी भाषा,मुंबईला विकून खाण्याची फेक नेरेटीव त्यांनी चालवली. राज ठाकरेंनी अदानी यांच्या व्यवसायात झालेली प्रगती याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला.(Thackeray Brothers)
उद्योजक होण्यासाठी जे कष्ट लागतात ते मात्र सांगायला ते विसरले.आणि ठाकरे बंधूंनी (Thackeray Brothers) गौतम अदानी यांचा केलेला पाहुणचार आणि सहकुटुंब केलेले फोटोसेशन सुद्धा विसरले.(Thackeray Brothers)
दुसरीकडे लाडकी बहीण योजनेद्वारे महिलाना आत्मनिर्भर करायचे जे धोरण महायुतीने चालवले आहे त्यावर न बोलता तीच योजना कॉपी पेस्ट करून घर काम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलाना दरमहा १५०० रुपये स्वाभिमान निधी देणार आहे असे वचन ठाकरे बंधूंनी (Thackeray Brothers) दिले आहे.पण एकेकाळी मविआचा घटकपक्ष आणि ठाकरेंचा जुना मित्र असलेल्या काँग्रेसने महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला विरोध केला होता यावर मात्र ठाकरे बंधू बोलले नाहीत. विधानसभेवेळी काँग्रेसने या योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर आतासुद्धा या योजनेचे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते दिले जाऊ नयेत म्हणून महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे.यावर चकार शब्द ठाकरे बंधूंनी (Thackeray Brothers) काढला नाही.मराठी माणूस म्हणजे त्यात मराठी महिला पण येतात आणि त्यांच्या साठीच्या योजना बंद करणे म्हणजे मराठी माणसाचे नुकसान नाही आहे का ? मुळात ही ऑन गोइंग योजना आहे आणि त्यामुळे तक्रार करूनही यात काही निष्पन्न होणार नाही आहे.(Thackeray Brothers)
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : काँग्रेसचे धोरण महिला विरोधी - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२६ साठी महायुतीने जो वचननामा प्रसिद्ध केला त्यात लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना आखली आहे ज्यामध्ये लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणे.बचत गटांच्या वस्तू विकण्यासाठी इ मार्केट स्थापन करणे.हक्काचे व्हेंडींग झोन तयार करणे.सुरक्षेसाठी रात्रीचे गस्त पथक यासह ड्रॉन पेट्रोलिंग. आणि महिला बचत गटांसाठी ३०००० अनुदान देण्याचे प्रस्तावित आहेत.यामध्ये महिलांची उन्नती होईल ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिकदृष्टया सक्षम होईल. पण याउलट फक्त मराठी माणूस ,मुंबई तुटणार ही भाषा करून आपले इप्सित साध्य करण्याचे काम ठाकरे बंधू (Thackeray Brothers) करीत आहेत.(Thackeray Brothers)