मुंबई : (Rupesh Savarkar) मुंबई महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ६३ चे भाजप उमेदवार रुपेश सावरकर (Rupesh Savarkar) यांच्याशी दै. मुंबई तरूण भारतने संवाद साधला. त्यांच्या प्रभागातील प्रश्न आणि त्यांचे पुढील ५ वर्षांचे व्हिजन याबद्दल जाणून घेतले. (Rupesh Savarkar)
१) आपण एक युवा उमेदवार म्हणून राजकारणात प्रवेश करत आहात? काय भावना आहेत?
- मला संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. त्यांनी दिलेल्या संधीचे मी नक्कीच सोने करेन.(Rupesh Savarkar)
२) या प्रभागात कोणत्या प्रमुख समस्या आहेत?
- प्रभाग क्रमांक ६३ मध्ये भरपूर समस्या आहेत. इथे कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. वर्सोवा रोडवर कचऱ्याचे ट्रक उभे राहत असल्याने वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेची समस्या निर्माण होते. मी निवडून आल्यानंतर सर्वात आधी हा प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच इथल्या नवीन इमारतींच्या ओसीचे प्रश्न प्रलंबित असल्याने लोकांची अडचण होते. यासाठी त्यांना मदत करणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगरसेवक नसल्याने पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून या पावसाळ्याच्या आत मी हा प्रश्न सोडवणार आहे.(Rupesh Savarkar)
३) तुमच्या विरोधात उबाठा गटाचा उमेदवार आहे. या आव्हानाला कसे सामोरे जाणार?
- मला कुठलेच आव्हान वाटत नाही. १५ वर्षांपूर्वी आताचे विरोधी उमेदवार या प्रभागात नगरसेवक होते. या १५ वर्षांत त्यांची खूप प्रगती झाली. परंतू, प्रभागाची प्रगती झाली नाही. त्यामुळे प्रगती या विषयात भाजप किती काम करते, हे लोकांना माहिती आहे. ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामाची गती वाढणार. लोक आमच्या सोबत असून माझा विजय निश्चित आहे.(Rupesh Savarkar)
हेही वाचा : India-Germany Relations : भारत–जर्मनी संबंधांच्या नवा अध्यायाला सुरुवात! पंतप्रधान मोदी - जर्मन चॅन्सलर मर्झ यांच्या बैठकीत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या
४) युवा उमेदवार म्हणून तुम्ही युवकांचे कोणते प्रश्न मार्गी लावणार आहात?
- गेल्या १३ वर्षांपासून मी पक्षात कार्यरत असून वयाच्या ३० व्या वर्षी मला भाजपने उमेदवारी दिली. मी तरूण असल्याने मला तरूणांच्या अनेक समस्यांबद्दल माहिती आहे. आमच्याकडे ८० टक्के उच्चभ्रू वर्ग आहे, तर २० टक्के झोपडपट्टी आहे. याआधी मी अनेकदा रोजगार मेळावे घेतले असून गेल्या दीड-दोन वर्षांत वेगवेगळ्या खाजगी नोकऱ्या मिळण्यास मदत केली. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर ही तीन ते चार पटींनी ही गती वाढवणार आहे.(Rupesh Savarkar)
५) जनतेचा प्रतिसाद कसा आहे? आणि जनतेला काय आवाहन कराल?
- जनता १५ तारखेची वाट पाहत असून ते मलाच संधी देणार ही मला खात्री आहे. मी निवडून आल्यानंतर प्रत्येक वर्षाचा रिपोर्ट कार्ड लोकांपर्यंत पोहोचवणार असून त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. लोकांकडून आलेल्या सूचनांवर पुढच्या वर्षभरात काम करणार आहे.(Rupesh Savarkar)