Asmita Institute : अस्मिता संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमातील दुसरे पुष्प उत्साहात

12 Jan 2026 20:36:37
Asmita Institute
 
मुंबई : (Asmita Institute) अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था (Asmita Institute) आयोजित राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत व विधिज्ञ ॲड. किशोर जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर पारखी यांनी प्रमुख वक्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संघरचनेतील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळलेल्या ॲड. जावळे यांच्या अनुभवसंपन्न विचारांना उपस्थितांनी मनापासून दाद दिली.(Asmita Institute)
 
विनायक पेडणेकर यांनी “विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक कसा असावा” याचे प्रभावी वाचन सादर केले. त्यानंतर समीर नागवेकर यांनी “नटवू निज कर्तुत्वाने” हे भावस्पर्शी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. ॲड. किशोर जावळे यांनी श्रीकृष्णाने एकट्या अर्जुनाला गीता का सांगितली, या उदाहरणातून उपस्थितांचे स्वागत करत “प्रेरणादायी व्यक्तींना भावनेच्या चौकटीत अडकवू नका” असा महत्त्वाचा संदेश दिला. स्वामी विवेकानंद हे केवळ संन्यासी नसून “योद्धा संन्यासी” का म्हटले जातात, याचे सखोल विवेचन त्यांनी केले. जिजीविशा व विजीविशा या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करत हिंदू धर्माची बैठक ही वेदांत विचारांवर आधारित असल्याचे सांगितले.(Asmita Institute) 
 
हेही वाचा : Ravindra Chavan : एमआयएम नेता नव्हे, सिंधी धर्मगुरू!
 
कौरव–पांडवांच्या उदाहरणातून “आपापसात भांडू नका, बाहेरून कोणी आले तर आम्ही १०५ आहोत” असा एकतेचा संदेश त्यांनी दिला. पंचमहावाक्यांचा अर्थ स्पष्ट करत “फळाची चिंता न करता कर्म करा”, “आजन्म कर्म करणाऱ्यालाच खरा संन्यासी म्हणावे”, तसेच गीतेचे प्रयोजन काय आहे हे सोप्या भाषेत उलगडले. काम करता करता देवाचे रूप पाहा, कुटुंबातील आपले स्थान ओळखा, योगक्षेम टाळू नका व घरच्या भाकरीकडे लक्ष द्या, असे जीवनोपयोगी विचार त्यांनी मांडले.(Asmita Institute)
 
संत परंपरा, समाज आणि सनातन संस्कृती महाराष्ट्रातील वारकरी व धारकरी संत परंपरा, त्यांचे सामाजिक योगदान, तसेच रामदास स्वामींना दासबोध का लिहावा लागला, याविषयी त्यांनी ऐतिहासिक संदर्भांसह माहिती दिली. इ.स. १६३४ मधील बाबा हरगोविंद व रामदास स्वामी यांचा संवाद याचे उल्लेख विशेष ठरले. मनातील माया काढून संसार करा, समाजाला कोणत्या प्रकारच्या संन्यासाची गरज आहे या विधानावर मार्मिक उदाहरणे देत श्रोत्यांना अंतर्मुख केले. “खोट्या प्रतिष्ठेपेक्षा सत्याची बाजू घेण्याची हिंमत आपल्यात आहे का?” हा विचारप्रवर्तक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.(Asmita Institute)
 
कार्यक्रमास संस्थेचे (Asmita Institute) सचिव श्रीकांत खंडकर, संस्थांचे हितचिंतक, पालक, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण व्याख्यानातून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वैचारिक बळ, आत्मविश्वास व कर्मनिष्ठेचा संदेश देण्यात आला. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.(Asmita Institute)
 
 
Powered By Sangraha 9.0