मुंबई : (Sushila Jadhav) मुंबई महानगरपालिका निवडणूकीची धामधुम सुरु आहे. यानिमित्त गेल्या ५ वर्षांपासून राधे राधे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रीय असलेल्या वॉर्ड क्रमांक ५१ च्या उमेदवार सुशीला संदीप जाधव (Sushila Jadhav) या राजकारणाच्या रिंगणात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दै. मुंबई तरूण भारतने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.(Sushila Jadhav)
१) तुम्ही या वॉर्डमध्ये किती वर्षांपासून आहात?
- माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच लहानाची मोठी झाली. मी आता राजकारणाच्या रिंगणात उतरली आहे. तसा माझा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. परंतू, मी ज्या भागात राहते तिथे गेल्या काही वर्षांत लोकांची परिस्थिती बिकट आहे. बिल्डर येऊन लोकांना घरांची आशा दाखवतात. पण त्यांचे स्वप्न पूर्ण करत नाहीत. लोकांना आठ वर्षांपासून घराचे भाडे मिळालेले नाही. माझे आईवडीलही त्याच भागात राहतात. ही संपूर्ण परिस्थिती बघून लोकांनी मला निवडणूकीच्या रिंगण्यात उतरण्यासाठी पाठिंबा दिला आहे. आता मला या लोकांसाठी लढायचे आहे.(Sushila Jadhav)
२) तुम्ही राधे राधे फाऊंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांपासून समाजकार्यात सक्रीय आहात. इथल्या कोणत्या प्रमुख समस्या तुम्हाला जाणवतात?
- इथे पाण्याची समस्या, गल्लीतील लाईट्स, सार्वजनिक शौचालये, तरुणांना नोकरी अशा समस्या आहेत. या समस्यांवर आम्ही आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करत असून यंदा जनतेने संधी दिल्यास यापुढेही त्यावर काम करत राहणार आहे.(Sushila Jadhav)
हेही वाचा : Vikram Rajput : बांग्लादेशी-रोहिंग्यांना परत पाठवणे हेच पहिले काम - विक्रम राजपूत
३) तुमच्या प्रभागात मतदारांचा कसा प्रतिसाद आहे?
- मी प्रचारानिमित्त प्रभागात फिरत असताना मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. आता मतदारसुद्धा घराणेशाहीला कंटाळले असून ही घराणेशाही बंद व्हावी, असे त्यांना वाटते. त्यामुळे लोकांना आता काम करणारा नेता हवा आहे.(Sushila Jadhav)
४) तुम्ही एक महिला उमेदवार आहात? तर या प्रभागातील महिलांच्या समस्या कशा सोडवणार आहात?
- प्रामुख्याने दैनंदिन जीवनात महिलांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असते. याशिवाय शौचालय आणि त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, असेही त्यांना वाटते. या सगळ्या समस्या डोळ्यापुढे ठेवून त्यादृष्टीने मी काम करेन.(Sushila Jadhav)
५) तुम्ही नगरसेवक निवडून आल्यास पुढच्या पाच वर्षांचे व्हिजन काय असेल?
- जो कुणी माझ्याकडे काम घेऊन येईल त्याचे काम पूर्ण करून देण्यास माझे प्राधान्य असेल. शिवाय पुढच्या पाच वर्षानंतर तो व्यक्ती स्वत:हून माझ्याकडे यावा आणि मला निवडणूकीत घरोघरी जाण्याची गरज भासणार नाही, असे काम मी करून देणार आहे.(Sushila Jadhav)