Vikram Rajput : बांग्लादेशी-रोहिंग्यांना परत पाठवणे हेच पहिले काम - विक्रम राजपूत

12 Jan 2026 15:51:56
Vikram Rajput
 
मुंबई : (Vikram Rajput) मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ५० चे उमेदवार विक्रम राजपूत  (Vikram Rajput) यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
 
१) भाजपने तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिली असून तुमची ही पहिलीच टर्म आहे. काय भावना आहेत?
 
- भाजप हा एक वेगळा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षात अपेक्षित असे काहीच नसते. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन भाजपने आपला पाया वेळोवेळी सिद्ध केला आहे. मला उमेदवारी पक्षाने आमचा नारा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. (Vikram Rajput)
 
२) तुमच्या प्रभागातील कोणत्या समस्या तातडीने सोडवणे गरजेचे आहे असे वाटते?
 
- माझ्या प्रभागात मोठमोठे परिसर येतात. यात ८० टक्के सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोक राहतात, तर काही झोपडपट्टीतील लोक राहतात. या प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अवैध पार्किंग, कचरा न उचलणे, शौचालय, पाणी असे अनेक प्रश्न असून यावर आपले काम सुरु आहे. (Vikram Rajput)
 
३) शहरातील वाढते अतिक्रमण आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या प्रश्नासाठी काय करणार?
 
- बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लीम यांची सर्वात मोठी घुसखोरी आहे. बहुतांश फेरीवाल्यांमध्ये बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची संख्या आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात येईल. त्यांचै वैध आणि अवैध कागदपत्रे तपासून त्यांना परत पाठवण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल. (Vikram Rajput)
 
हेही वाचा : Rupesh Savarkar : युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - रुपेश सावरकर
 
४) इथे लव्ह जिहाद आणि लँड जिहादचा मोठा प्रश्न आहे. यासाठी काय उपाययोजना करणार?
 
- लँड जिहाद म्हणजे एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभारतात आणि नंतर तिथे पक्के बांधकाम करतात. अशावेळी अधिकाऱ्यांवर जरब असणे महत्वाचे आहे. अधिकारी काही गोष्टी करत असल्यास ते धोकादायक आहे. काही गोष्टी माझ्या निदर्शनास येत असून नगरसेवक झाल्यानंतर सर्वात आधी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन असे अनधिकृत काम होणार नाही याची काळजी घेईल. तसेच तरुणांना ड्रग्जच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी त्यावर कडक शासन करण्यात येईल. लव्ह जिहादमध्ये हिंदू मुलींना खोटी नावे सांगून त्यांना फसवले जाते. त्यामुळे मुली भुलथापांना बळी पडल्याने त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. असे प्रकार होऊ नये यासाठी आम्ही हिंदू जागरण मंच किंवा भाजपच्या वतीने काळजी घेतो. (Vikram Rajput)
 
५) ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तुमच्या विरोधात उबाठा गटाचा उमेदवार आहे. या आव्हानाकडे कसे बघता?
 
- त्यांच्या वेगळे होण्याचे आणि एकत्र येण्याची दोन्ही कारणे आपण बघितली. त्यांचे राजकारण सोयीस्कर आहे. या प्रभागातील त्यांचा उमेदवार मराठी नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांनी मुस्लीमांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरचा मामू चालतो, जोगेश्वरी रेप केसमधील आरोपी चंगेज मुलतानी चालतो. त्यामुळे यावेळी भाजप १०० टक्के महापौर बसवणार या भीतीने हे त्यांचे शेवटचे पाऊल आहे, असे मला वाटते. (Vikram Rajput)
 
६) या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल?
 
- जनतेच्या हाकेला धावणारा आणि त्यांच्या अडीअडचणीत उभा राहणारा, अशी माझी ओळख आहे. सुशिक्षित, तरुण आणि स्थानिक उमेदवार आहे. त्यामुळे भविष्यात माझ्यापासून जनतेला आणि जनतेपासून मला वेगळे करू शकत नाही, ही माझी गॅरंटी आहे. या संघर्ष करणाऱ्या तरुणाला तुम्ही साथ द्या आणि माझी पुढची पाच वर्षे प्रभाग क्रमांक ५० च्या नागरिकांसाठी असतील, एवढा विश्वास मी देऊ शकतो. (Vikram Rajput)
 
 
Powered By Sangraha 9.0