Stray Dog Row :"रुग्णालयात भटके कुत्रे आले तर वावगं काय?", असं म्हणणाऱ्या शर्मिला टागोरांना न्यायालयानं फटकारलं!

12 Jan 2026 18:10:39

Sharmila Tagore

मुंबई : (Sharmila Tagore)
देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चांगलाच गाजत असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या मुद्यावरून प्राणी मित्र आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास असलेले असे दोन गट आमनेसामने आलेले आहेत. खंडपीठाने ९ जानेवारीला झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना खडे बोल सुनावले. तसेच एम्सच्या उदाहरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वास्तव समजून घेण्यास सांगितले.(Sharmila Tagore)

अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय करायला हवे, यासाठी काही सल्ले व सूचना दिल्या होत्या. त्याही सर्वोच्च न्यायालयाने झिडकारून लावल्या. न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबद्दल शर्मिला टागोर यांचे युक्तिवाद पूर्णपणे अवास्तव असल्याचे म्हटले.(Sharmila Tagore)

शर्मिला टागोर यांचा युक्तिवाद

शर्मिला टागोर यांच्या वकिलांनी दिल्लीतील एम्स परिसरात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या एका गोल्डी नावाच्या भटक्या कुत्र्याचे उदाहरण दिले. हा कुत्रा अनेक वर्षांपासून या परिसरात मिसळला असून सर्वांचा लाडका झाल्याचे टागोर यांच्या वकिलांनी म्हटले. टागोर यांच्या वकिलांनी पुढे म्हटले, "कुत्र्यांच्या आक्रमकतेची ओळख आणि त्यांच्या स्वभावाचा आणि वर्तनाचा विचार करण्यासाठी आम्ही एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा सल्ला देत आहोत. सामान्य आणि आक्रमक कुत्र्यांमध्ये फरक करायला हवा. जॉर्जिया आणि आर्मेनिया सारख्या देशांत रंगाचा कोड वापरून कुत्र्यांची विभागणी केली जाते. असा काही उपाय आपल्याकडे राबवला जावा, असेही वकिलांनी सांगितले.(Sharmila Tagore)

"तुम्हाला वास्तवाचे भान आहे का?" 

यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे समर्थन करणे योग्य नाही. तसेच या कुत्र्याला काय ऑपरेशन थिएटरमध्येही नेले जात होते का? असाही प्रश्न खंडपीठाने विचारला. सर्वोच्च न्यायालयाने या सूचना फेटाळून लावल्या, जॉर्जिया आणि आर्मेनिया या देशांची लोकसंख्या किती आहे? जे सल्ले अमलात येऊ शकतात ते द्या. वास्तव काय आहे ते पाहा. असेही न्यायालयाने सुनावले. खंडपीठाने म्हटले की, रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांच्या शरीरावर अनेक जीव-जंतू असण्याची शक्यता आहे जर असे कुत्रे रुग्णालयासारख्या परिसरात असतील तर त्यांच्यामुळे किती भीतीदायक परिस्थिती उद्भवू शकते? तुम्हाला वास्तवाचे भान आहे का?"अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केली.(Sharmila Tagore)

Powered By Sangraha 9.0