BMC Election : मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत

12 Jan 2026 17:02:20

BMC Election
 
ठाणे : (BMC Election) १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूककरिता (BMC Election) मतदार संघातील मतदारांना मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने दिनांक ३०.१२.२०२५ च्या शासन परिपत्रकान्वये भरपगारी सुट्टी देण्याबाबत आदेश पारित केले आहेत.(BMC Election)
 
या परिपत्रकाच्या अनुषंगाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे (BMC Election) आयुक्त, निवडणूक अधिकारी अनमोल सागर यांनी आवाहन केले आहे की, भिवंडी शहरातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या संस्थेतील मतदार असलेल्या कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गतदेखील लागू राहणार असून, खाजगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थपना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांनी त्यांच्या कामगार/अधिकारी/ कर्मचारी यांना दिनांक ३०.१२.२०२५च्या परिपत्रकान्वये मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.(BMC Election)
 
हेही वाचा : Sushila Jadhav : समाजकार्याकडून राजकारणाकडचा प्रवास 
 
तसेच, ज्या अत्यावश्यक सेवेतील ज्या आस्थापनांना सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा (BMC Election) हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन तीन तासांची विशेष सवलत देण्याची दक्षता घेण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये (BMC Election) मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व आस्थापना, संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.(BMC Election)
 
 
Powered By Sangraha 9.0