मुंबई : (Ravindra Chavan viral video) सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यासमोर झुकले आणि त्यांच्या पाया पडले, असा दावा केला जात आहे. या व्हिडिओसोबत “भाजप एमआयएमसमोर झुकत आहे का?” अशा आशयाचे कॅप्शन देत राजकीय हेतूने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या व्हायरल दाव्यामागचे सत्य वेगळेच आहे. (Ravindra Chavan viral video)
फॅक्ट तपासणीअंती समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अर्धसत्य असून त्याचा इम्तियाज जलील यांच्याशी कोणताही संबंध नाही. हा प्रसंग ७ जानेवारी २०२६ रोजी उल्हासनगरमध्ये पार पडलेल्या भाजपच्या एका जाहीर सभेतील आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Ravindra Chavan viral video)
हेही वाचा : BMC Election : मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत
व्हिडिओमध्ये ज्यांच्या चरणी रविंद्र चव्हाण नतमस्तक होताना दिसत आहेत, ती व्यक्ती एमआयएमचे नेते इम्तियाज जलील नसून, उल्हासनगरमधील सिंधी समाजाचे आदरणीय आध्यात्मिक संत आणि नेते साई छोटू गुरुमुखदास जगियासी आहेत. संतांच्या चरणी नतमस्तक होणे हे श्रद्धा आणि आदराचे प्रतीक मानले जाते. रविंद्र चव्हाण यांनीही याच श्रद्धेने आणि संस्कारातून त्या संतांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला होता. याचा राजकारणाशी किंवा कोणत्याही पक्षीय नेत्याशी संबंध नाही. (Ravindra Chavan viral video)
मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मुद्दाम चुकीच्या कॅप्शनसह पसरवून भाजप आणि एमआयएम यांच्यातील राजकीय संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार फेक नरेटिव्ह पसरवण्याचा असून, सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा व्हायरल व्हिडिओंवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागचे सत्य तपासावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Ravindra Chavan viral video)