PMO Seva Teerth : स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार, १४ जानेवारीनंतर ‘सेवा तीर्थ’ खुले होणार!

12 Jan 2026 16:27:03

PMO Seva Teerth

नवी दिल्ली : (PMO Seva Teerth)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन कार्यालय लवकरच खुले होणार आहे. मकर संक्रांतीनंतर म्हणजेच १४ जानेवारीनंतर पंतप्रधान कार्यालयातून कामाला सुरुवात करतील. हे कार्यालय सेवा तीर्थ परिसराचा भाग असेल. ज्यात पंतप्रधान कार्यालयासोबतच अन्य २ कार्यालये असतील. सेवा तीर्थ भागात एकूण ३ इमारती बनवण्यात आल्या आहेत.(PMO Seva Teerth)

पंतप्रधान कार्यालयाचा 'साउथ ब्लॉक' ते 'सेवा तीर्थ' असा प्रवास

माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच आठवड्यात रायसीना हिल्सजवळील नवीन कार्यालय सेवा तीर्थ १ इथून कामाला सुरुवात करू शकतात. नवीन कार्यालयाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि आता ते अंतिम टप्प्यात आहे. हा परिसर सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा हिस्सा आहे. सध्या पीएमओ साऊथ ब्लॉकमध्ये आहे. सेवा तीर्थ परिसरात पीएमओशिवाय कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय यांचे कार्यालय असेल. त्यासाठी ३ इमारती बांधण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवालय मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच सेवा तीर्थ २ याठिकाणी स्थलांतरित झाले आहे.(PMO Seva Teerth)

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये सुरू होते जे कायम भारताचे सत्ता केंद्र राहिले. आता पूर्ण सेवा तीर्थ परिसर जवळपास ११८९ कोटी खर्च करून उभारण्यात आला आहे. त्याला लार्सन ऍन्ड टुब्रो या कंपनीने बनवले आहे. सेवा तीर्थ परिसर एग्झिक्यूटिव्ह एन्क्लेव्ह १ नावानेही ओळखला जातो. हे संपूर्ण कॉम्प्लेक्स २,२६,२०३ चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे.(PMO Seva Teerth)

ब्रिटिश काळातील दक्षिण आणि उत्तर ब्लॉक पूर्णपणे रिकामे झाल्यानंतर ते "युग युगिन भारत संग्रहालय" मध्ये रूपांतरित केले जातील जे भारताच्या ५,००० वर्ष जुन्या वारशाचे प्रदर्शन करेल. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या मते, "हे संग्रहालय भारताच्या समृद्ध वारशाचे आणि प्रगतीच्या अटळ भावनेचे प्रतीक असेल.(PMO Seva Teerth)



Powered By Sangraha 9.0