मुंबई : (Ravindra Chavan) विकास, कामगिरी, आकडे यावर मत मिळवणे जेव्हा कठीण असते, तेव्हा विरोधकांकडून 'फेक नरेटिव्ह'चे शस्त्र वापरले जाते. समाज माध्यमांवर अफवा पसरवणे, बनावट व्हिडिओ तयार करणे अशा गोष्टी याकाळात केल्या जातात. ज्यामुळे सामान्य मतदार गोंधळात पडतो आणि मग संभ्रम निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार महापालिका निवडणुक तोंडावर असताना भाजप कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात घडला आहे. एका सभेदरम्यान ते 'एआयएमआयएम' नेत्याच्या पाया पडले असे नरेटिव्ह पसरवण्याचा रेटून प्रयत्न झाला. मात्र ती व्यक्ती एमआयएम नेता नसून सिंधी समाजाचे धर्मगुरु छोटे नवाब साई गुरुमुखदास जगियासी आहेत. व्यासपीठावर आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आदराने त्यांना अभिवादन केले होते.(Ravindra Chavan)
विरोधकांनी व्हायरल केलेला व्हिडिओ हा उल्हासनगर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या जाहीर सभेचा आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी धर्मगुरु छोटे नवाब साई गुरुमुखदास जगियासी यांचे व्यासपीठावर स्वागत केले व त्यांना आदराने नमस्कार करत त्यांना अभिवादन केले आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचा परिचय करून दिला. विरोधकांनी मात्र केवळ मत मिळवण्यासाठीचे उत्तम खाद्य म्हणून याकडे पाहिले आणि एमआयएम नेत्याचा संदर्भ त्यास जोडून दिला. छोटे नवाब साई गुरुमुखदास जगियासी यांनी स्वतः या भेटीचे छायाचित्र आपल्या समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या विरोधात विरोधकांनी पसरवलेल्या फेक नरेटिव्हची एकाअर्थी पोलखोल झाली असून विरोधक तोंडघशी पडल्याचे यावरून दिसतेय.(Ravindra Chavan)
१९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून लाखो हिंदू निर्वासित भारतात आले. भारत-पाकिस्तान विभाजनाच्या वेळी सिंध हा नव्या पाकिस्तानच्या स्थापनेसाठी एक निर्णायक प्रांत ठरला. या काळात हिंदू आणि शीख समाज तेथे अल्पसंख्याक होता. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली. धर्माधारित राष्ट्ररचनेमुळे त्यांचे सामाजिक आणि आर्थिक अस्तित्व धोक्यात येईल या भीतीने त्यांनी आपले घर, व्यापार आणि परंपरा मागे सोडून नव्या भविष्याच्या शोधात भारताकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. सिंधी शीखांना आपले सर्व काही मागे ठेवून भारतात नव्याने आश्रय घ्यावा लागला. ते मुख्यतः गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या शेजारील राज्यांमध्ये स्थायिक झाले.(Ravindra Chavan)
हेही वाचा : Ravindra Chavan viral video : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि इम्तियाज जलील प्रकरणाचा खुलासा, व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काय?
जगातील सर्वात मोठी सिंधी वस्ती उल्हासनगरात
जगातील सर्वात मोठी सिंधी वस्ती उल्हासनगर येथे असल्याचे मानली जाते. उल्हासनगर हे आज भारतातील सिंधी शीखांचे प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे. येथे 'गुरु नानक दरबार' आणि 'दान गुरु नानक दरबार' हे दोन प्रमुख गुरुद्वारे आहेत. उल्हासनगरमध्ये सुमारे २५,००० सिंधी शीख राहतात. रोज प्रभात कीर्तनाला जवळपास २,५०० भक्त उपस्थित राहतात. गुरुनानक जयंतीच्या वेळी येथे लाखो श्रद्धाळू सहभागी होतात. मोठ्या उत्साहात प्रभातफेरी, भजन-कीर्तन आणि सामूहिक लंगरचे आयोजन केले जाते. या धार्मिक उपक्रमांनी विभाजनानंतरच्या विस्थापित समाजात आत्मिक स्थैर्य आणि ऐक्याची भावना निर्माण केली.(Ravindra Chavan)
१९८४ च्या दंगलींच्या काळातही उल्हासनगरमधील सिंधी शीख समुदायावर कोणतेही द्वेषजन्य संकट आले नाही, हे त्यांच्या सामाजिक सौहार्दाचे द्योतक आहे. त्यामुळे विभाजनानंतरच्या विस्थापनातही सिंधी शीखांनी आपल्या धार्मिक परंपरा, भाषिक ओळख आणि सामाजिक बंध या तिन्ही घटकांना समान महत्त्व देत नवा समतोल साधला.(Ravindra Chavan)
छोटू साई राम हे सिंधी समाजाचे संत आहेत. सिंधी समाज कोणत्याही कार्यारंभी त्यांचा आशीर्वाद घेतात. मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी त्यांचे आशीर्वाद घेऊन हिंदू समाजाच्या संस्कृतीचा सन्मान केला. सिंधी समाजाच्या संताचा समाजकंटकानी फेट नरेटीव्ह पसरवून अवमान केला आहे. त्यामुळे आम्हा सिंधी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. येत्या १५ जानेवारीला मतदार याचा वचका नक्की काढतील.(Ravindra Chavan)
- कुमार आयलानी, आमदार, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये सिंधी समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात आहे. प्रत्येक साधू-संत केवळ भगवाधारीच नसतात. प्रत्येकाच्या परंपरा वेगवेगळ्या असू शकतात. कोणी साध्या कपड्यात असतात, कोणी वेगळ्या पोशाखात असतात. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती सिंधी समाजाचे धर्मगुरु आहेत. त्यामुळे सिंधी समाजाचे नेतृत्व करणारी पूज्य व्यक्ती म्हणून रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी त्यांना नमस्कार करण्यात काही गैर नाही. एमआयएम पक्षाचा नेता म्हणून अपप्रचार करणे चुकीचेच आहे. लोकांना अशा फेक नरेटीव्हपासून सावध राहायला हवे.(Ravindra Chavan)
- स्वामी भारतानंद सरस्वती, प्रदेश महामंत्री, अखिल भारतीय संत समिती