मुंबई : (Nitesh Rane) उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प अदानी यांना दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. (Nitesh Rane)
हेही वाचा : Ravindra Chavan : एमआयएम नेता नव्हे, सिंधी धर्मगुरू!
नितेश राणे म्हणाले, “राज ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतात,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी नितेश राणे यांनी मुंबईकरांना थेट इशाराही दिला. “मुंबईकरांनी सावध राहायला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी आगामी काळात राजकारणात दिशाभूल करणारे मुद्दे उभे केले जाऊ शकतात, असा संकेत दिला. (Nitesh Rane)